विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता त्यांना मिळणारा बोर्डिंग पास हा...!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

विमानतळावर खासगी वाहनातुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना स्वतंत्र पासची गरज नसल्याचे  पुणे पोलिसांनी केले स्पष्ट

पुणे : लोहगाव विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी होऊ लागली. दरम्यान खासगी वाहनामधून विमानतळावरुन ये-जा करणाऱ्या विमान प्रवाशांकडील बोर्डिंग पास हाच डिजीटल पास म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे, त्यासाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नसल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी पुणे स्पष्ट केले.

- Video : श्रीकृष्ण मालिकेतला 'भीम' आहे पुणेकर; मराठमोळ्या महेंद्र घुलेंशी खास बातचीत

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे 25 मार्चपासून देशातील विमान वाहतूक बंद होती. मात्र अनेक घडामोडीनंतर अखेर 24 मे रोजी मध्यरात्री राज्य सरकारच्या परवानगीनंतर देशातंर्गत विमान वाहतूकीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई या शहरांसाठी विमान वाहतूक सुरू झाली.

- Big Breaking : आता कॉलेजही भरणार शिफ्टमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य!

दरम्यान, विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर खासगी वाहनाने जावे किंवा यावे लागते. मात्र शहरात प्रवास करण्यासाठी पोलिसांचा डिजीटल पास आवश्यक असल्याने नागरीकांकडून डिजीटल पाससाठी अर्ज केले जात होते. ही बाब गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या निदर्शनास आली. 

- पुण्यावरून 'या' आठ शहरांसाठी सुरु झाली विमानसेवा; लोहगाववरून टेक ऑफ

त्यानुसार विमान प्रवाशांनी विमानतळापर्यंत ये-जा करण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनाचा वापर केल्यास त्यांना स्वतंत्र पास देण्याची गरज नाही, त्यांच्याकडे असणारा बोर्डिंग पास हाच डिजीटल पास म्हणून ग्राह्य धरला जाईल, असे बच्चन सिंग यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boarding pass for air passengers will be considered as a digital pass