संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वृक्षारोपण, नेत्रदानासाठी जनजागृती

warwand
warwand

वरवंड : एक मित्र, एक वृक्ष... नेत्रदान हाच मार्ग मोक्षाचा... अशी साद घालणाऱ्या युवकांची चौफुल्याच्या चौकात भेट झाली. तुमच्या प्रेमाची व्यक्ती असेल तर त्यांच्या नावाने वृक्ष लावाच असे सांगाताना नेत्रदानाचीही ते जागृती करत होते. जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीच्या वाटेवर असा हटके प्रयोग करणारे वीस एक युवक अनेकांनी आकर्षीत करत होते. पालखी सोहळा चौफुल्यात पोचण्यापूर्वी येणाऱ्या प्रत्येक दिंडीला ते वृक्षारोपण, नेत्रदानाची माहिती देत होते. पालखी सोहळ्यात जाहीरातबाजी अनेकजण करतात पण एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या युवकांनी केलेले निस्वार्थी काम कैकपटीने वेगळेपण जपणारेच ठरते आहे.

ध्यास नेत्रदानाचा..,
  हा श्वास श्री विठ्ठलाचा.. 
      दृष्टीहीनांना दृष्टी.....
        हा मार्ग मोक्षाचा.... असे ब्रीद घेवून काम करणाऱ्या युवकांच्या गटाला सामुदायिक नेतृत्वाचा चेहरा आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष अशा ढाचेबद्ध कार्यपद्धतीला फाटा देवून काम करणाऱ्या युवकांची स्टाईल अनेकांना भावते. यवतचा मु्क्काम आटोपून मार्गस्थ झालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा भांडगाव येथे पोचला. त्यावेळी वरूण राजाने सोहळ्याच्या स्वागताला हजोरी लावली. वारकरी आनंदला पंधरा वीस मिनीट शिडकावा झाला. सोहळा पुढे सरकत होता. चौफुला येथे सोहळ्यातील वारकऱ्यांना काही माहिती सांगणारा युवकांचा ग्रुप उभा होता. नेत्रदानाची माहिती देणारे युवक... वृक्ष संगोपनासह लागवडीची गरज सांगणारे फलक दिसले. सहज चौकशी केली त्यावेळी ग्रपला अध्यक्ष, उपाध्यक्ष अशी रूढ पद्धत नसून सामुदायिकपणे काम केले जात असल्याचे प्रत्येकाने सांगितले. ग्रुपला डाॅ. प्रेमकुमार भट्टड, डाॅ. श्रीवल्लभ अवचट व प्रशांत मुता सारखी लोक गाईड करतात. डाॅ. भट्टड भागातील दौंड, बारामती तालुक्यात नेत्रदान जागृतीचे दहा वर्षापासून काम करतात. जाहीरातबाजीपेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देणारे डाॅ. भट्टड यांच्या प्रेरणेने मुथा, अवचट, रमेश वत्रे यांच्या सारखे युवक या कामात पुढे सरसावले आहेत. त्यामुळे पाच वर्षात जागृती आता चळवळीत रूपांतरीत होताना दिसते आहे. नेत्रदान व वृक्षारोपनाचे मोठे काम या निमित्ताने कोणतीही जाहीरातबाजी न करता झाले आहे.

चौफुल्यापासून जवळच्याच खंडोबा माळ हिरावगार करण्याचे उद्धीष्ठ ग्रुपने घेतले आहे. तेथे मोठी शंभर वृक्ष लावणात आली आहेत. एक मित्र एक वृक्ष व त्यांच्या प्रेमाचे झाड या कल्पनेला ग्रामीण भागातून मोठी साथ मिळते आहे. डाॅ. भट्टड यांच्या नेत्रदान जागृतीपासून सुरू झालेल्या कामाच्या साखळीन पर्यावरण जागृतीचे भरीव काम केले आहे. या चळवळीमुळे भागातून वीस लोकांनी नेत्रदान केले आहे. शेकडो लोकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे.  त्याला समाजातून साथ मिलू लागली आहे. पत्रकार संघानेही हातभार लावतसया ग्रुपच्या पालखी सोहळ्याच्या वाटेवरील चौफुल्यातील वेगळपण निश्चीतच चळवळीचे रूपच असल्याचे  जाणवून गेले. दहा पत्रके पालखी सोहळ्यात वाटली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com