

Swami Govind Dev Giri
esakal
Ayodhya Ram Mandir Donation Theft Case Explained : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्याच्या प्रकरणानंतर ट्रस्टच्या प्रशासकीय रचनेत सतत फेरबदल होत आहेत. सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ.अनिल मिश्र यांच्यानंतर आता कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी पद सोडणार असल्याच्या चर्चेने नवीन खळबळ उडाली होती, मात्र यावर स्वामी गोविंदगिरींनी आता प्रतिक्रिया दिली आहे. आपण कोषाध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.