
Ayurveda
sakal
पुणे : ‘‘जनमानसात आयुर्वेदाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी लहान मुलांमध्ये आयुर्वेदासंदर्भातील संस्कार रुजविणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आयुर्वेदाचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. आयुर्वेदाबाबत जिज्ञासा, कुतूहल जागृत झाले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे,’’ असा सल्ला विज्ञान, शिक्षण आणि आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला.