डेंग्यू, चिकुनगुनियासह 'या' आजारांवर पुणे विद्यापीठाच्या संशोधकाने शोधले औषध

रमेश मोरे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

'सालपर्णी' या नावाची औषधी वनस्पती झारखंड येथे आढळते. डॉ. गंझू यांनी पिंपळे गुरव येथील घरी अशा दुर्मिळ वनस्पती कुंड्यांमधून लावलेल्या आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या संशोधक डॉ. राजेशकुमार गंझु यांनी चौदा वर्षाच्या संशोधनानंतर रेबीज, डेंग्यू, चिकुनगुनिया, जापनीज ताप, चिकन पॉक्स, हेपेटाईटीस, गालफुगी यांसारख्या अँटी व्हायरल आजारावर देशातील पहिले आयुर्वेदीक औषध शोधले आहे. या शोधासाठी भारत सरकार पेटेंट कार्यालयाकडून त्यांना या औषध निर्मितीचे पेटेंट मिळाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

रेबीज, डेंग्यू, चिकुनगुनिया, ताप या आजारांवर या औषधाची मात्रा चांगली लागू पडत असल्याने रुग्णास त्याचा फायदा होत असल्याचा दावा डॉ. गंझु यांनी केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बायोकेमेस्ट्रीत एम.एस्सी. केल्यानंतर त्यांनी पी.एच.डी. मिळवली आहे. 

खुंटी (झारखंड) येथील मूळ स्थानिक असलेल्या राजेशकुमार यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावी पूर्ण केले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण आंध्रप्रदेश येथून पूर्ण केले. आजोंबासोबत बालपणापासून ते जंगलात औषधी वनस्पतींच्या शोधात जायचे. आपल्या प्राचीन आयुर्वेद औषध शास्त्रांची गोडी बालपणापासून लागल्याने स्वदेशात औषधे विकसित करण्याचे त्यांनी ध्येय ठेवले. खडतर प्रवासानंतर हे संशोधन पूर्ण केले असल्याचे ते सांगतात.

- पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून आयटी इंजिनिअरची आत्महत्या

दरम्यानच्या काळात अनेक मल्टीनँशनल कंपन्या, विदेशी कंपन्यांनी त्यांना मोठ्या पगारासह नोकरीची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी ती न स्वीकारता आपल्याच देशात सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी औषध विकसित करण्याचे ठरवल्याचे डॉ. गंझू आवर्जून सांगतात. 'सालपर्णी' या नावाची औषधी वनस्पती झारखंड येथे आढळते. डॉ. गंझू यांनी पिंपळे गुरव येथील घरी अशा दुर्मिळ वनस्पती कुंड्यांमधून लावलेल्या आहेत.

- देवेंद्र फडणवीस राऊतांकडे चहा प्यायला नाही विसरले, कारण...

चौदा वर्षाच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या या संशोधनाची चाचणी पिंपरी चिंचवडमधील लोकमान्य रिसर्च सेंटर येथून पूर्ण केली. तर नँशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ आणि न्युरो सायन्सेस बेंगलोर, हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई, वरूण हर्बल हैद्राबाद, इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडीकल जयपूर, आयुषराज एटरप्रायझेस प्रा.लि.जयपूर यांच्याकडे चाचण्या केल्या.

दरम्यान, व्हायरल आजाराशी झगडत असलेल्या रूग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या. याचा रूग्णांना फायदा झाल्याने या औषधाचे पेटंट भारत सरकार पेटंट कार्यालयाकडून त्यांना मिळाले आहे.

- पुणे : मार्केटयार्डात किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू

या संशोधनासाठी खूप संघर्षमय प्रवास करावा लागला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षण पूर्ण करण्यापासून ते संशोधनापर्यंत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. मित्र, स्वकीय, नातेवाईकांकडून हात उसणे पैसे घेतले, तर कधी मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेऊन संशोधन सुरू ठेवले. एकदा पंतप्रधानांना भेटण्याची माझी इच्छा आहे.
- डॉ. राजेश कुमार गंझू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayurvedic drug patent to a researcher Dr RajeshKumar Ganjhu of Savitribai Phule Pune University