
Pune Crime
Sakal
पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर-कोमकर गँगवॉरचा भडका उडाला. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. ५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेत झालेल्या या घटनेनं खळबळ उडाली. आयुष हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता. तसंच वनराजचा सख्खा भाचाही होता.