
पुण्यात नाना पेठ परिसरात टोळीयुद्धातून आयुष कोमकर याची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला हल्लेखोरांसह आयुषचे आजोबा बंडु आंदेकर यांच्यासह ८ जणांना अटक केली होती. आता आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक करण्यात आलीय. आयुषच्या हत्येनंतर चौघेही फरार झाले होते. त्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुजरातमधून ताब्यात घेतलं.