

पुणे, ता. ४ : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णांच्या उपचारांचे दावे भागविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता योजनेशी संलग्न रुग्णालयांतून रुग्णांवर उपचार वेळेत होण्यास मदत होणार आहे.
राज्यात जवळपास दोन हजार खासगी, तर ५०० सरकारी रुग्णालये आहेत. तसेच राज्यातील सर्व नागरिक या योजनेअंतर्गत उपचार मिळण्यास पात्र आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना १ जुलै २०२४ पासून राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत ‘हमी तत्त्वावर’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या दाव्यांच्या देयकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य आरोग्य हमी सोसायटीने केली होती.
या आर्थिक वर्षासाठी आयुष्मान भारत योजनेच्या राज्य हिस्स्यासाठी मूळ अर्थसंकल्पात ४३७ कोटी रुपयांची, तर मे २०२६ मधील अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे आणखी ४६८ कोटी रुपये मंजूर झाले. त्यामुळे एकूण ९०५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध झाली आहे.
हा निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात येणार असून, योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांना दाव्यांची रक्कम अदा करण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. या निधीतून आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थी रुग्णांच्या उपचारांच्या खर्चाचे दावे रुग्णालयांना अदा केले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.