येरवडा कारागृहात हलविण्याचा ब-हाटेचा अर्ज फेटाळला

सध्या तो औरंगाबाद येथील कारागृहात आहे
Yerwada Jail
Yerwada Jailpune

पुणे : मोक्काअंतर्गत अटकेत असलेल्या रवींद्र ब-हाटे याला औरंगाबाद कारागृहातून येरवडा कारागृहामध्ये हलविण्याबाबतचा अर्ज विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळला आहे. त्यामुळे ब-हाटे याचा मुक्काम हा औरंगाबाद कारागृहात राहणार आहे. खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांत ब-हाटेला अटक करण्यात आली आहे. ब-हाटे हा त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या माध्यमातून तपासात अडथळे निर्माण करू शकतो. त्यामुळे त्याला औरंगाबाद कारागृहातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. मात्र त्याने तेथून येरवडा कारागृहात हलविण्याचा अर्ज न्यायालयात केला होता. ससून रुग्णालयामध्ये हृदयविकारा संदर्भात उपचार करायचा आहे. (Pune News)

Yerwada Jail
'तालिबान' आणि इस्लाम बदनाम!

त्यामुळे मला येरवडा कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणी ब-हाटे याने अर्जाद्वारे केली होती. या अर्जाला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला. ब-हाटे याची जानेवारी महिन्यात अ‍ॅन्जिओप्लास्टी झालेली आहे. त्यामुळे आॅपरेशन करण्यासारखे उपचार तुर्तास बाकी नाहीत. औरंगाबादला हलविण्यापुर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, डॉक्टरांनी प्रवास करण्यासाठी त्याला कोणती अडचणी नसल्याचे सांगितले आहे. औरंगाबाद येथील घाटी शासकीय रुग्णालयात अद्ययावत सुविधा आहेत. त्यामुळे गरज पडल्यास तेथे त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार केले जाऊ शकतात. आवश्‍यक असेल तर त्याला मुंबर्इ येथील शासकीय रग्णालयात देखील पाठवता येर्इल.

Yerwada Jail
'नितीनजी गोड बोलतात, पण पत्र फार कठोर लिहितात'

त्यामुळे त्याला येरवडा कारागृहात आणण्याची करण्याची गरज नाही. तसेच त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यास तो काही षडयंत्र करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अँड. चव्हाण यांनी केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ब-हाटे याचा अर्ज फेटाळण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com