पुणे - राज्यात बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) जवळपास ४४ हजार २८६ जागा उपलब्ध आहेत. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत एकूण २९ हजार १६६ विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट झाली आहेत..राज्यातील सरकारी, सरकारी अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापित, विद्यापीठातील विभाग, विनाअनुदानित खासगी व्यावसायिक महाविद्यालये यामधील बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते..या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यात ५५ हजार ११६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यातील २९ हजार १६६ विद्यार्थ्यांना पहिल्या कॅप फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले.पहिल्या कॅप फेरीअंतर्गत प्रवेशासाठी शनिवार (ता. ४) ते सोमवारपर्यंतचा (ता. ६) कालावधी दिला आहे. दुसऱ्या कॅप फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील मंगळवारी (ता. ७) जाहीर होईल. ऑनलाइन अर्ज निश्चित करण्यासाठी आठ ते १० ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. या फेरीची निवड यादी १३ ऑक्टोबरला जाहीर होईल, अशी माहिती सीईटी कक्षाने दिली आहे..प्रवेशाची आकडेवारी‘कॅप’अंतर्गत बी. फार्मसीच्या एकूण जागा - ४४,२८७गुणवत्ता यादीतील विद्यार्थी - ५५,११६प्रवेशाचा पर्याय अर्ज क्रमांक एक भरलेले विद्यार्थी - ३८,४६२एकूण अलॉटमेंट मिळालेले विद्यार्थी - २९,१६६अलॉटमेंट न मिळालेले विद्यार्थी - १५,१२१पहिल्या ‘कॅप’फेरीत ऑटो-फ्रिज केलेले विद्यार्थी - १३,८९५ .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.