b. t. kawade road.jpg
b. t. kawade road.jpg

 ...म्हणून पुण्यातील 'हा' रस्ताच पोलिसांनी केला बंद

घोरपडी (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या दिवशी नागरिकांनी विसर्जन घाटावर गर्दी करू नये, यासाठी एम्प्रेस गार्डन शेजारील कॅनॉलचा रस्ता वानवडी पोलिसांनी दहा दिवस बंद ठेवला आहे. बी. टी. कवडे रस्ता व सोलापूर रस्ता अशा दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून रस्ता एक सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

बी. टी. कवडे रस्ता विसर्जन घाट येथे दरवर्षी मोठी गर्दी होत असते. घोरपडी, भीमनगर, वानवडी, कॅम्प या सर्व परिसरातून हजारों नागरिक कॅनॉलवर विसर्जनासाठी येत असतात. सध्या पुणे शहरात करण्याचे सावट असल्याने नागरिकांनी नदीपात्रात, कॅनॉलवर आणि विसर्जन घाट येथे गणेश मूर्तींचे विसर्जन न करता आपल्या घरीच गणपतीचे विसर्जन करावे. असे महानगरपालिकेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

कॅनॉलचा रस्ता बंद ठेवल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या शेकडो नागरिकांना मात्र पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. हडपसर, बी. टी. कवडे रस्त्यावरील नागरिक कॅम्पकडे जाण्यासाठी नजिकचा रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर करतात. हा रस्ता बंद केल्याने पुढील काही दिवस नागरिकांची गैरसोय होणार आहे. 

कॅनॉलवर विसर्जन न करता नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन करावे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने अमोनियम बायकार्बोनेट पावडर देण्यात येणार आहे. तसेच फिरत्या हौदांची सुविधा सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर कॅनॉलवर विसर्जन करता येणार नसेल तर बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांनी विसर्जन करायचे कुठे असा प्रश्न पडला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कॅनॉलमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करू नये. आपल्या घरीच गणपतीचे विसर्जन करावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तरीही लोक विसर्जनासाठी येऊ शकतात. त्यामुळे रस्ता बंद करून कॅनॉलवर जाण्यासाठी मज्जाव केला आहे. विसर्जन नंतर हा रस्ता खुला करण्यात येईल. 
-क्रांतिकुमार पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलीस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com