मन, बुद्धीच्या शुद्धीकरणासाठी हरिपाठ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

‘एकाग्रचित्ताने आपल्या मनामध्ये विठ्ठल असणे, ही धारणा आहे. त्याचे चिंतन करणे, त्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे ध्यान आहे. जी धारणा आपल्या मनामध्ये असते, तेच ध्यान आपल्यामध्ये कायम राहते. मन आणि बुद्धीमधील घाण मानवी शरीरातून बाहेर काढण्यासाठी हरिपाठ आहे,’’ असे प्रतिपादन प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांनी केले.

पुणे - ‘एकाग्रचित्ताने आपल्या मनामध्ये विठ्ठल असणे, ही धारणा आहे. त्याचे चिंतन करणे, त्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे ध्यान आहे. जी धारणा आपल्या मनामध्ये असते, तेच ध्यान आपल्यामध्ये कायम राहते. मन आणि बुद्धीमधील घाण मानवी शरीरातून बाहेर काढण्यासाठी हरिपाठ आहे,’’ असे प्रतिपादन प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन केले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या हरिपाठावर ते निरूपण करीत आहेत.
 सातारकर म्हणाले, ‘‘कोणतीही गोष्ट अवघड असेल, तर माणूस त्याकडे प्रवृत्त होत नाही; त्यापासून दूर जातो. त्यामुळे संतांनी फार मोठा विचार केला आहे.

संत ज्ञानेश्‍वरांनी सोप्या भाषेत हरिपाठ लिहिला. ईश्‍वरी सत्तेला शेवटचा शब्द ‘आत्मा’ आहे. आपण संतांना आत्मा म्हणत नाहीत, तर महात्मा म्हणतो. यातच संतांची महती समजते.’’ प्रवचनाचा कार्यक्रम १९ ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी सात ते आठ या वेळेत होणार आहे. महिनाभर सुरू राहणाऱ्या या प्रवचनाला विनामूल्य प्रवेश असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baba Maharaj Talking