PUNE : बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची पोलिस चौकशी करा

जुन्नर न्यायालयाचे पोलिसांना आदेश
Baba Ramdev  Acharya Balkrishna
Baba Ramdev Acharya Balkrishna

पुणे : ‘पतंजली’ने तयार केलेल्या ‘कोरोनील’ या औषधाने कोरोना (Corona) बरा होतो, असा दावा करणारे योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांची पोलिस चौकशी करावी, असा आदेश जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (magistrate court) जुन्नर पोलिसांना दिला आहे.

न्यायदंडाधिकारी पी. व्ही. सपकाळ (Magistrate P. V. Sapkal)यांनी हा आदेश दिला. कोरोना बरा करणारे औषध ‘कोरोनिल’ शोधून काढल्याचा दावा रामदेव बाबा यांनी २४ जून २०२० रोजी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे नागरिकांची दिशाभूल झाली, असा आरोप करीत याबाबत मदन कुऱ्हे यांनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत खासगी फौजदारी तक्रार जुन्नर न्यायालयात दाखल केली आहे.

Baba Ramdev  Acharya Balkrishna
राज्यात वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लागणार का? राजेश टोपेंनी केलं स्पष्ट

या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या प्रकरणाचा तपास करून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अन्वये ७ फेब्रुवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने जुन्नर पोलिसांना दिले आहे. कोरोनिल संदर्भात दाखल झालेला राज्यातील हा पहिलाच खटला आहे. भादवि कलम १२०-ब, ४२०, २७०, ५०४, ३४ तसेच कलम ३,४,५ ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार खासगी फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

६ जुलै २०२० रोजी दाखल झालेल्या खासगी तक्रार प्रकरणावर जुन्नर येथील न्यायालयात विविध युक्तिवाद झाले. बाबा रामदेव यांची पत्रकार परिषद दिल्ली येथे झाली असतानाही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाला तपासाचे आदेश देण्याचे सर्व अधिकार आहेत, असे तक्रारदाराच्या वतीने युक्तिवादाची लेखी नोंदही सादर करण्यात आली. कोरोना महामारीच्या आरोग्य संकटाच्या काळात असे खोटे दावे करणे, यामागे भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांकडून केवळ पैसा कमविण्याच्या व्यापारी उद्देश होता, असा आरोप तक्रार अर्जातून करण्यात आला आहे.

Baba Ramdev  Acharya Balkrishna
PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत दिली माहिती

'कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तसेच कायदेशीर व्यवसाय करण्याच्या हक्कांचा प्रत्येकाने जबाबदाऱ्यांसह व वाजवी बंधनांची जाणीव ठेऊन वापर केला पाहिजे, याची मांडणी करणारा हा खालच्या स्तरावरील न्यायालयात चालणारा हा नवीन पायंडा निर्माण करणारा महत्त्वाचा उत्कृष्ट खटला आहे.'

- ॲड.असीम सरोदे, तक्रारदाराचे वकील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com