बबनराव पाचपुते यांच्या गाडीला अपघात; पाचपुते सुखरूप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पाचपुते यांची कार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मागील बाजूने धडकली. नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही इजा झाली नाही. या गाडीत पाचपुते यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक यशवंत भोसले आणि चालक युवराज उबाळे होते.

शिक्रापूर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री नऊ वाजून 50 मिनिटांनी नगर रस्त्यावरील चौफुला येथील हॉटेल कल्याणी समोर भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून बबनराव पाचपुते सुखरूप बचावले.

पाचपुते यांची कार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मागील बाजूने धडकली. नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही इजा झाली नाही. या गाडीत पाचपुते यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक यशवंत भोसले आणि चालक युवराज उबाळे होते. तिघेजण सुखरूप आहेत. पाचपुते यांच्यासह चालकानं सीट बेल्ट लावल्यानं मोठा अनर्थ टळला.

अपघातानंतर पाचपुते पुण्याकडे रवाना झाले. अपघाताची माहिती कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन तर अनेकांनी मोबाईलवरुन पाचपुते यांची विचारपूस करत धीर दिला.

Web Title: Babanrao Pachpute vehicle accident near Shirur