सर्वार्थाने पाया पडण्यासारखी एकच व्यक्ती ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे : आशा भोसले

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आशा भोसले यांच्या हस्ते सत्कार
pune
punesakal
Updated on

पुणे : ‘‘सर्वार्थाने महान असलेली आणि पाया पडण्यासारखी एकच व्यक्ती इथे आहे, ती म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. कोल्हापुरात बाबासाहेबांची आणि माझी भेट झाली. पुढे त्यांचा पाहुणचार करण्याची संधीही मिळाली. गो.नी दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, दत्ता ढवळे यांच्यासारखी माणसे आमच्या घरी यायची, हे आमचे नशीब होते. बाबासाहेबांनी अनेक गडकिल्ले सर केले त्याचे वर्णन त्यांनी ऐकवले. मनाची ताकद असल्याने त्यांनी हे शिवधनुष्य पेलले गेले.’’ अशा शब्दांत ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंध उलगडले. (Pune News)

pune
देवानं मला 50 वर्ष दिलेत, त्यातील 25 बाबासाहेबांना देते- आशा भोसले

जीवनगाणी, जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वरगंधार या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, आमदार आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. आशाताई म्हणाल्या,‘‘आम्ही आपापल्या व्यवसायात व्यग्र असलो, तरी स्नेह कायम राहिला. बाबासाहेबांनी दिलेली महादेवाची पिंडी आणि नंदी आजही माझ्या घरात आहे.

pune
बारामतीकरांनो, काळजी घ्या! पुन्हा निर्बंधाची वेळ आणू नका : अजित पवार

आयुष्यात आलेल्या चांगल्या गोष्टी धरून ठेवते आणि वाईट सोडून देते. बाबासाहेबांनी आजवर मला खूप दिले. पुस्तक वाचनातून आयुष्य समृद्ध होत गेले. मला दुःख वाटले, तर मी पुस्तके वाचते. मला देवाने अजून पन्नास वर्षे आयुष्य दिले तर त्यातील पंचवीस वर्षे मी बाबासाहेबांना देईन.’’ आंबेगाव येथील शिवसृष्टीमधील सरकार वड्यात निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘ओंजळ’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ‘शिवकल्याण राजा’ हा सांगीतिक कार्यक्रमही झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय उपाध्ये आणि श्रीराम केळकर यांनी केले.

पुन्हा इथेच जन्म घ्यावा...

‘‘शिवाजी महाराजांची गोडी वडिलांमुळे लागली. अनेक मित्रांच्या साथीने ती वाढली आणि जोपासली. वेड लागल्याशिवाय इतिहास कळत नाही. मलाही शिवाजी महाराजांचे वेड लागले. त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम, कार्य भुरळ घालते. त्यांची राष्ट्रनिर्मिती, स्वराज्य निर्मितीची भावना खूप मोलाची आहे,’’ अशा शब्दात पुरंदरे यांनी भावना व्यक्त केल्या. ‘‘जीवनात मला मंगेशकर, ठाकरे कुटुंबियांचा स्नेह लागला. गजाननराव मेहेंदळे यांची मदत झाली. जीवनात मी आनंदी आणि सुखी आहे. लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा इथेच जन्म घ्यावा,’’ असेही उद्‌गार पुरंदरे यांनी भावूक होऊन काढले.

pune
‘रानडे इन्स्टिट्युट’च्या स्थलांतरणाचा निर्णय अखेर रद्द

शिवचरित्र हे जीवनशिक्षण म्हणून शिकावे : राज ठाकरे

‘‘शिवतीर्थावर शिवसृष्टी उभारली तेव्हा उत्सुकता म्हणून रोज जायचो. तेव्हाच मी सर्वप्रथम त्यांना भवानी तलवार घेऊन आले असताना भेटलो. तेव्हापासून त्यांचा सहवास लाभला. बाबासाहेबांची इतिहास वर्तमानाशी जोडून सांगण्याची हातोटी भावणारी आहे. इतिहास आणि वर्तमानाशी संबंध जोडणारा हा धागा आहे. त्यांच्या वाणीतील शिवचरित्र सहज समजणारे आहे. शिवचरित्र इतिहास म्हणून नाही, तर जीवनशिक्षण आपण शिकले पाहिजे. शिवचरित्र अनेकांनी लिहिले पण बाबासाहेबांनी ते घराघरात, मनामनात पोहोचवले. महाराष्ट्रात देशात आणि जगभरातही त्यांचे शिवचरित्र गेले आहे. त्यांनी पोवाडा म्हटला नसला तरी ते शिवशाहीर आहेत. इतिहास संशोधक आहेत. इतिहास सहज समजावा यासाठी त्यांनी कार्य केले. यापुढेही हे कार्य पुढे चालू राहील,’’

- राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com