उरुळी कांचन : बेबी कालवा फुटण्याच्या मार्गावर !

Baby canal can be broken in uruli kanchan pune
Baby canal can be broken in uruli kanchan pune

उरुळी कांचन - पुणे महानगरपालिकेने जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात मागील चार दिवसापासून क्षमतेपेक्षा जादा अधिक पाणी सोडल्याने, बेबी कालवा लोणी काळभोर, कुंजीरवाडी व उरुळी कांचन हद्दीत ओसांडुन वाहु लागला आहे. त्यातच कालव्यातील जलपर्णी व इतर गवतामुळे कालव्याचे पाणी कालव्याच्या थेट भरावावरुन वाहु लागल्याने कालवा कोणत्याही क्षणी फुटण्याची भिती निर्माण झाली आहे. पुर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी कालव्यातील पाण्याचे प्रमाण कमी करावे अशी वारंवार विनंती करुनही, खडकवासला पाटबंधारे खाते व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने एकमेकाकडे बोटे दाखवत पाणी कमी करण्यास असर्थमतता दाखवली आहे. 

पुण्यात दांडेकर पुलाजवळ नवा कालवा फुटल्याने झालेले नुकसान डोळ्यासमोर असतानाच, खडकवासला पाटबंधारे खाते व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भांडणात बेबी कालवा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याने उरुळी कांचन, कुंजीरवाडी व उरुळी कांचन परीसरातील शेतकरी हवालदि्ल बनले आहेत. येत्या बारा तासाच्या आत बेबी काल्यातील पाणी पातळी नियंत्रनात आनली नाही तर, लोणी काळभोर हद्दीतील रायवाडी परीसरात बेबी कालवा जेसीबीच्या मदतीने ओढ्यात फोडण्याचा इशारा लोणी काळभोर येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याला दिला आहे. 

महानगरपालीकेच्या वतीने पुणे शहरातील शुध्द केलेले सांडपाणी मुंढवा जॅकवेलमधून चार पंपाच्या मदतीने साडेसतरा नळी ग्रामपंचायत हद्दीत बेबी कालव्यात सोडले जाते. सदर पाण्याचा उपयोग हवेली व दौंड तालुक्यातील शेतीसाठी केला जोतो. मात्र बेबी कालवा बरीच वर्षे बंद असल्याने त्याची मजबुती ढिसाळ व पोकळ झाल्याने सगळीकडे गळती होत आहे त्यासाठी या कालव्याची मजबुती करणे अत्यंत आवशक आहे. मागिल वर्षभऱापासुन मुंढवा जॅकवेलमधून चार पंपाच्या सहाय्याने पाणी सोडण्यात आले. सुरुवातीच्या काळात कालव्यात वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होते. मात्र मागील काही दिवसापासून जॅकवेलमधील पंपांची संख्या वाढविल्याने त्यतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने आणि जलपर्णीच्या अडथळ्याने दिवसेंदिवस कालव्याच्या परिसरात मोठ्या पाणी गळती वाढत आहे. कालव्यालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत. तर कालव्याच्या परिसरातील घरांमध्ये पाणी पाझरत आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना, रायवाडी येथील सुनिल बबन काळभोर हे शेतकरी म्हणाले, मागिल कांही दिवसापासुन बेबी कालव्यात क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडल्याने कालव्याच्या भऱावावरुन पाणी कालव्यालगतच्या शेतात जात आहे. यामुळे कालव्यालगतच्या शेताला तळ्याचे स्वरुप आले आहे. बेबी कालव्यातुन क्षमतेएवढे पाणी सोडण्यास एकाही शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र सध्या पाणी मोठ्या प्रमानात सोडल्याने कालवा फुटण्याची भिती निर्माण झाली आहे. याबाबत पाटबंधारे खात्याच्या विवि्ध अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी भेटुन, वस्तुस्थितीची माहिती दिलेली आहे. मात्र अधिकारी महानगरपालिकेकडे कर महानगरपालिकेचे अधिकारी पाटबंधारे खात्याकडे बोट दाखवत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

याबाबत खडकवासला पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता पाडुरंग शेलार म्हणाले, कालव्यातुन क्षमतेपेक्षा अधिक पाणी वाहत असल्याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्याकडुन आलेल्या आहेत. मात्र अधिक्षक अभियंता संदीप चोपडे व महानगरपालिकेच्या पाणी विभागाचे कार्यकारी अधियंता प्रमोद उंडे यांच्या आदेशानुसार क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडले जात आहे. पाणी कमी करण्यासाठी वरील दोन अधिकाऱ्यांकडे विनंती करुनही कारवाई होत नाही. 

तर खडकवासला पाटंबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संदीप चोपडे म्हणाले, पुर्व हवेलीमधील शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार पांडुरंग शेलार यांना पाणी कमी करण्याच्या सुचना यापुर्वीच दिलेल्या आहेत. याबाबतचा निर्णय शेलार यांनीच घ्यावयाचा आहे. पाणी कमी जास्त करण्याचा व आपला कांहीही संबध नाही.

तर महानगरपालिकेच्या पाणी विभागाचे कार्यकारी अधियंता प्रमोद उंडे म्हणाले, पाणी कमी करण्याबाबत शेलार यांच्याकडुन सुचना आलेल्या आहेत. मात्र खडकवासला पाटंबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संदीप चोपडे यांनी पाणी कमी करण्याबाबत शेलार यांच्या सुचना मान्य करु नका असा आदेशच दिलेला आहे. यामुळे संदीप चोपडे यांचा जोपर्यंत आदेश येत नाही तो पर्यंत पाणी कमी करणे शक्यच नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com