पुण्यात चक्क झाडाचं केल ओटीभरण

baby shower  of tree in pune
baby shower of tree in pune

पुणे : आजपर्यंत तुम्ही महिलांचे ओटीभरणाचा कार्यक्रम कित्येकदा पाहिले असतील पण, तुम्ही एखाद्या झाडाच्या ओटीभरणाचा कार्यक्रम झालेला कधी ऐकले आहे का? हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. झाडाचे ओटीभरण. तुम्ही म्हणाला हे कसं शक्य आहे. अहो,शक्यता सोडा हे खरोखर घडले आहे. कुठे माहितीये? अर्थातच..एकमेव स्थळ पुणे. पुण्यात एका महिलेने चक्क झाडाच्या ओटीभरणाचा कार्यक्रम साजरा केला आहे. अगदी महिलांचे ओटीभरण होते तसाच. इतकेच नाही तर झाडाला साडी नेसुन बांळतीणीसारखा शृंगारही  केला होता. 

पुण्यातील नीदा यादवाड यांनी हा झाडाच्या ओटीभरणाचा कार्यक्रम साजरा केला. कर्वेनगर भागात राहणाऱ्या नीता यांच्या बंगल्यासमोरील बागेत अनेक वृक्ष आहेत. वृक्षप्रेमी नीतां यांनी काही वर्षांपुर्वी रत्नागिरीवरुन नारळाचे झाड आणून बंगल्यासमोरील बागेत लावले होते. परंतू आजुबाजुच्या ईमारतींमुळे त्या झाडाला पुरेसा सुर्यप्रकाशही मिळेना झाला. अखेर दुसऱ्या ठिकाणी झाड लावून त्याला जगविण्याची धडपड सुरु ठेवली. झाड चांगले वाढू लागले. तीन आठवडयांपुर्वी त्याला तुर आल्याने नारळ लागण्यास सुरुवात होणार याचा नीता यांना आनंद झाला. स्वत:च्या बाळासारखं वाढविलेल्या झाडाला नीता यांनी ओटी भरणाचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. झाडाच्या ओटीभरणाच्या कार्यक्रमाला त्यांच्या मैत्रीणींनीही उपस्थित राहून साथ दिली. बाळतीण बाईचे जसे ओटी भरण होते तसेच ओटी भरण नीता यांनी या झाडाचे केले. 

''निसर्गाचं आणि आपल एक नातं आहे. आपण झाडांची चांगली निगा राखली तर, ती चांगली फळे देतात. आशिर्वाद देतात. त्यामुळे हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने अनेक मैत्रिणींना देखील भेटता आले.'' असे नीता यादवाड यावेळी म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com