esakal | बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो प्राॅक्टर्डबाबत झाला मोठा निर्णय; परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Exam

विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा घेतल्यानंतर आता अंतिमपूर्व वर्षातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग राहिलेल्या विषयांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.

बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो प्राॅक्टर्डबाबत झाला मोठा निर्णय; परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बॅकलॉग, श्रेणीसुधार, बहिस्थ अभ्यासक्रमांच्या अंतिमपूर्व वर्षाच्या परीक्षेत गैरव्यवहार होऊ नये, यासाठी प्राॅक्टर्ड मेथडचा वापर केला जाणार होता, पण तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थ्यांचा विरोध यामुळे प्राॅक्टर्ड ऐवजी इतर माध्यमातून परीक्षेवर नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान परीक्षा ३ ते १६ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत, याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

मोठी बातमी : विद्यार्थी-शिक्षकांची दिवाळी होणार आणखी गोड; दिवाळीच्या सुट्टीत वाढ

विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा घेतल्यानंतर आता अंतिमपूर्व वर्षातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग राहिलेल्या विषयांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. सुमारे १९ हजार विद्यार्थ्यांनी श्रेणीसुधारसाठी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. बॅकलॉग, श्रेणीसुधार या परीक्षा केवळ ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. 

ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅब यापैकी काहीच नाही, त्यांनी आपल्या महाविद्यालयात किंवा जवळच्या महाविद्यालयात जाऊन, तेथील संगणक कक्षातील सुविधेचा वापर करून ऑनलाईन परीक्षा द्यावी, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत घेण्यात येणार आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे. 

Video: 'महाराष्ट्रात दररोज हाथरस घडतोय'; शिरुर प्रकरणावरून दरेकरांची सरकारवर टीका

दरम्यान, अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक मर्यादांचा गैरफायदा घेत कॉपी प्रकार घडले आहेत. याची पुनरावृत्ती बॅकलॉकच्या परीक्षांमध्ये होऊ नये यासाठी विद्यापीठाने ही परीक्षा प्राॅक्टर्ड प्रणाली वापरली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते, पण नेटवर्क प्रोब्लेममुळे परीक्षा देताना विद्यार्थ्यांना जागेवरून उठावे लागले, परीक्षेसाठी स्थान बदलल्यास त्याचा परिणाम थेट निकालावर होणार असल्याने विद्यार्थ्यांनी प्राॅक्टर्डला  विरोध केला आहे. त्यामुळे विद्यापीठाने प्राॅक्टर्ड ऐवजी अन्य मार्गाने परीक्षेवर नियंत्रण ठेवता येईल का, याचा विचार सुरू केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image