esakal | मोठी बातमी : विद्यार्थी-शिक्षकांची दिवाळी होणार आणखी गोड; दिवाळीच्या सुट्टीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Teachers

शिक्षण विभागाने गुरूवारी (ता.५) काढलेल्या परिपत्रकात १२ ते १६ नोव्हेंबर अशी केवळ पाचच दिवसांची दिवाळी सुट्टी देण्यात आली होती.

मोठी बातमी : विद्यार्थी-शिक्षकांची दिवाळी होणार आणखी गोड; दिवाळीच्या सुट्टीत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दिवाळीच्या सुट्ट्या वाढवून मिळाव्यात, अशा विद्यार्थी, शिक्षकांच्या मागणीचा आदर आणि विचार करून शालेय शिक्षण विभागाने आता दिवाळीच्या सुट्ट्या वाढविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालक यांच्यासह शिक्षकांच्या दिवाळीचा गोडवा अधिक वाढणार आहे.

Video: 'महाराष्ट्रात दररोज हाथरस घडतोय'; शिरुर प्रकरणावरून दरेकरांची सरकारवर टीका

दिवाळीची सुट्टी केवळ पाचच दिवस असल्याचे यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले होते. दिवाळी सणाची सुट्टी कमी दिल्याने विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर होता. कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. दरम्यान गणेशोत्सवातही ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यामुळे दिवाळीची मोठी सुट्टी मिळेल, अशी अपेक्षा विद्यार्थी-पालक आणि शिक्षक यांची होती. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या वाढवून मिळाव्यात, अशी मागणी विविध स्तरातून होत होती. ही मागणी विचारात घेऊन आता शिक्षण विभागाने १४ दिवस दिवाळीच्या सुट्ट्या दिल्या आहेत.

भाजप नेत्यासह कार्यकर्त्यांना अटक; राज्य सरकारचा आदेश धुडकावत काढली यात्रा​

दिवाळीच्या सुट्या शनिवारपासून (ता.७) सुरू होणार असून त्या २० नोव्हेंबरपर्यत असणार आहेत. शिक्षण विभागाने गुरूवारी (ता.५) काढलेल्या परिपत्रकात १२ ते १६ नोव्हेंबर अशी केवळ पाचच दिवसांची दिवाळी सुट्टी देण्यात आली होती. या सुट्ट्या वाढविण्याला होकार दर्शवित आता शासनाने  शुक्रवारी नवे परिपत्रक काढत सुट्ट्या वाढवून १४ दिवस दिल्या आहेत.

"उन्हाळ्याच्या सुट्यानंतर सगळ्यात जास्त सुट्या म्हणून दिवाळीच्या सुट्याकडे मुलांचे लक्ष असते. दरवर्षीप्रमाणे जास्त नाहीत, पण चौदा दिवसांच्या का होईना सुट्या मिळाल्याने विद्यार्थी वर्ग खुशीत आहे."
- हेमा चव्हाण, पालक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image