पुणे - जुन्या सांगवीत मुख्य बस थांब्याची दुरावस्था

रमेश मोरे
शुक्रवार, 11 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील वसंत दादा पुतळा मुख्य बस थांब्यावरील प्रवाशी निवारा शेडची दुरावस्था झालेली आहे. मुख्य बस थांबा असल्याने येथुन पुणे व उपनगराकडे जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

रोज पुणे व विविध भागात येथुन बसगाड्यांच्या जवळपास पन्नास फेऱ्या होतात. ऊन, वारा, पावसात प्रवाशांना परिसरातील हॉटेल, दुकाने, झाडांचा आश्रय घ्यावा लागतो. गेली अनेक वर्षापासुन या निवाराशेडची सुधारणा करण्यात आलेली नाही. निवारा शेडच्या पत्र्यांचा रंग उडालेला असुन लोखंडी पाईपांना गंज लागला आहे. तर जेष्ठांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था नाही.

प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत मुख्य बसस्थानक असुनही येथे प्रवाशांसाठी अपुरी जुनी व्यवस्था जैसे थे आहे. यातच निवारा शेडमधे अस्वच्छता असल्याने प्रवाशी नागरीक बसस्थानक परीसरातील झाडांचा आश्रय घेतात. महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरीकांना बसण्याची व्यवस्था नसल्याने बस थांब्यासमोर ताटकळत थांबावे लागते. तर शेजारीच काही अंतरावर जेष्ठ नागरीकांसाठी उभारण्यात आलेल्या कट्टयाचा प्रवाशांना आश्रय घ्यावा लागतो. प्रवाशी संख्येच्या तुलनेत येथे नविन निवारा शेडची व्यवस्था करावी अशी मागणी सांगवीकर नागरीकांमधुन होत आहे. 

"गतवर्षी पीएमपीएल व्यवस्थापनाकडे येथील अपुरा निवारा व्यवस्था व दुरावस्थेबाबत उपाययोजना करण्याबाबत मागणी केली होती. मात्र अजुनही काम झाले नाही. याचा पाठपुरावा करून येथील समस्या सोडविणार आहे, असे नगरसेविका शारदा सोनवणे यांनी सांगितले. 

गेली अनेक वर्षासुन हा प्रवाशी थांबा जैसे थे स्थितीत आहे. येथे बसण्यासाठी खुर्च्या नाहीत.बसथांबा परिसरात पालिकेकडुन झाडाखाली खुर्च्या बाके बसविण्यात आली आहेत.मात्र पावसाळ्यात निवाऱ्याची व्यवस्था नाही, असे सुजाता निकाळजे यांनी सांगितले. 

Web Title: bad condition of bus stop in old sangavi pune

टॅग्स