esakal | कडूस-साबुर्डी येथील ते भगदाड बसलंय 'आ' वासून
sakal

बोलून बातमी शोधा

bagh.jpg

कडूस (ता. खेड) येथे कडूस-साबुर्डी रस्त्याच्या ओढ्यावरील मोरी पूलाला मोठे भगदाड पडले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना गिळंकृत करण्यासाठी 'आ' करून बसल्याचा भास होणाऱ्या या भगदाडामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

कडूस-साबुर्डी येथील ते भगदाड बसलंय 'आ' वासून

sakal_logo
By
महेंद्र शिंदे

कडूस : कडूस (ता. खेड) येथे कडूस-साबुर्डी रस्त्याच्या ओढ्यावरील मोरी पूलाला मोठे भगदाड पडले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना गिळंकृत करण्यासाठी 'आ' करून बसल्याचा भास होणाऱ्या या भगदाडामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार कळवूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम खात्याच्या अधिका-यांना अपघातास दोषी ठरवले पाहिजे, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.

 Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

कडूस-साबुर्डी रस्त्यावर कडूस येथे वीज पुरवठा केंद्राच्या मागील ओढ्याच्या मोरी पुलावरील भराव खचला आहे. पुलाला मोठे भगदाड पडले आहे. पुलाचे सिमेंट पाईप तुटल्याने भरावाची माती, खडी, डांबर खाली निखळून गेले आहे. पाच फुट खोलीची पोकळी निर्माण झाली. हे भगदाड जसे काय रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकाला गिळंकृत करण्यासाठी 'आ' वासून बसल्याचा भास होत आहे.

तसेच या रस्त्यावरून तालुक्याच्या पश्चिम भागाकडील वाशेरे, साबुर्डी, वेताळे, सायगाव, चास आदी गावांकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. रस्त्याला पडलेले विवर जवळ आल्याशिवाय वाहनचालकांना दिसून येत नसल्याने वाहन चालकांची भंबेरी उडते. खड्डा चुकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. प्रशासनाला अनेकदा कळवले आहे, पण दुरुस्ती होत नाही. अपघात घडल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दोषी धरण्याची मागणी उद्योजक प्रताप ढमाले, अशोक बंदावणे, चांगदेव ढमाले, दामोदर बंदावणे, वाहनचालक, प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा मोरीपुल पुरता नादुरुस्त- दोन वर्षांपूर्वी चाळीस लाख रुपये खर्चून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले होते. त्यावेळी सुध्दा या ठिकाणी पुलाला भगदाड पडलेले होते. परंतु अधिकाऱ्यांनी दुरुस्तीकडे डोळेझाक केली होती. वरवरची डागडुजीनंतर याठिकाणी पुन्हा महिन्याभरात भगदाड पडले ते विस्तारत आहे. याठिकाणी नवीन साकव पुलाचे काम झाले पाहिजे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top