प्रवाशांनो, हा राज्यमार्ग आहे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात मार्गस्थ होणाऱ्या शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गावरील दरकवाडी ते वाडा (ता. खेड) हा डांबरी रस्ताच गायब झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न पडला आहे. तालुक्‍यात संबंधित मार्गाची दखल घेणारा सार्वजनिक बांधकाम विभागच दखल घेत नसल्याने चोरीला गेलेल्या डांबरी रस्त्याची तक्रार करायची तरी कोणाकडे, हा प्रश्न वाहतूकदारांना पडला आहे.

चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात मार्गस्थ होणाऱ्या शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गावरील दरकवाडी ते वाडा (ता. खेड) हा डांबरी रस्ताच गायब झाला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न पडला आहे. तालुक्‍यात संबंधित मार्गाची दखल घेणारा सार्वजनिक बांधकाम विभागच दखल घेत नसल्याने चोरीला गेलेल्या डांबरी रस्त्याची तक्रार करायची तरी कोणाकडे, हा प्रश्न वाहतूकदारांना पडला आहे.

शिरूर-भीमाशंकर राज्यमार्ग हा खेड तालुक्‍यातून मार्गस्थ होणारा सर्वांत जास्त वर्दळीचा मार्ग आहे. दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक निसर्ग सौंदर्यासह श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनाला येत असतात व त्यामुळे या पट्ट्यात काही वर्षांपासून पर्यटनाच्या माध्यमातून येथील आदिवासींसह अन्य व्यावसायीकांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. मात्र, चालू वर्षी जुलै महिन्यात मंदोशी घाटात भूस्खलन होऊन रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली व त्यानंतर राजगुरुनगर ते वाळद दरम्यान राज्य मार्गाला पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. या मार्गावर काही ठिकाणी अगदी एक ते दीड फुटापासून आठ ते दहा फुटापर्यंत लांबीचे खड्डे पडलेले आहेत. त्यातच दरकवाडी ते वाडा या मार्गावरील डांबरी रस्ताच अस्तित्वात राहिलेला नसून येथील डांबरी रस्ताच बेपत्ता झाला की काय, असा प्रश्न पडतो आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad Condition Of Shirur-Bhimashankar Road