तीन आठवड्यांतच शिवभोजन थाळीचा दर्जा खालावला; लाभार्थ्यांची तक्रार 

तीन आठवड्यांतच शिवभोजन थाळीचा दर्जा खालावला; लाभार्थ्यांची तक्रार 

पिंपरी : शिवभोजन थाळीच्या अन्न पदार्थांच्या दर्जाची वेळोवेळी तपासणी करण्याचा निर्णय फोल ठरला आहे. वल्लभनगर येथील एसटी स्थानकातील शिवभोजन थाळीचे जेवण निकृष्ट असल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. पुरवठा निरीक्षकांचेही केंद्रांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत, गरजू आणि गरीब लोकांसाठी 10 रुपयांत "शिवभोजन' थाळी योजना सुरू करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड महापालिका, वल्लभनगर एसटी स्थानक आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्या उपहारगृहांमध्ये योजना राबविली जात आहे. सर्व केंद्रांतील अन्नपदार्थांची वेळोवेळी तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व औषधे प्रशासनावर टाकण्यात आली असताना वल्लभनगर येथील एस.टी.स्थानकाच्या उपहारगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे शिवभोजन देण्यात आल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे.

योजनेचे लाभार्थी विशाल खंदारे म्हणाले,""शिवभोजन थाळीमधील सोयाबीनची भाजी आणि डाळीची गुणवत्ता खराब होती. यापूर्वीही येथे 2 ते 3 वेळा निकृष्ट जेवण मिळाले. योजनेअंतर्गत, जेवणाचा दर्जा योग्य राहिला पाहिजे अन्यथा ही जनता आणि सरकारची फसवणूक ठरेल. अन्नपदार्थांची आकस्मिक तपासणी केली जावी. निकृष्ट दर्जाचे जेवण बनविले गेल्याचे निदर्शनास आल्यास केंद्र चालकांचे परवाने निलंबित झाले पाहिजेत.'' 

बाथरुमचे लॉक दाखवायला 'तो' तिला आत घेऊन गेला अन्...

'वायसीएम'मध्ये थाळी संख्या वाढविण्याची मागणी ! 
यशवंतरा चव्हाण स्मृती रुग्णालयात शिवभोजन थाळीची संख्या प्रतिदिन 150 इतकी निश्चिनत करण्यात आली आहे. परंतु, जेवणासाठी इच्छूक लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे, तेथे केंद्रचालक व लोक यांच्यात वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. या ठिकाणी किमान 50 थाळी वाढवून देण्याची मागणी केंद्रचालकांनी केली आहे. 

शिवभोजन केंद्रांवरील पुरवठा निरीक्षकांच्या नेमणूका तात्पुरत्या स्वरुपाच्या होत्या. मात्र, ते केंद्रांना भेटी देत आहेत. या केंद्रांवरील अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी अन्न व औषधे प्रशासन विभागाकडून नमुने घेतले जात आहेत. 
- नागनाथ भोसले, परिमंडल अधिकारी, "फ' विभाग
पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com