बाहुबली अन् कटप्पाचा पुणेकरांना 'दुध' पिण्याचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे :  वर्षाअखेरीस पुणेकरांच्या भेटीला चक्क बाहूबली आणि कटप्पा दाखल झाले आहेत. यावेळी 'दारु नको, दुध प्या' असा संदेश  बाहुबली आणि कट्टप्पा त्यांनी नागरिकांना दिला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी नागरिकांना दुधाच्या पिशव्या देवून प्रबोधन केले.

आज 31 डिसेंबर 2018 वर्षाचा शेवटचा दिवस उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार. परंतु, नवीन वर्षाची सुरवात करताना 31 डिसेंबरचा रात्री मोठ्या प्रमाणावर दारूचे व्यसन केले जाते. दारू पिऊन वर्षाचा शेवट केला जातो. यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता असते. यातून अनेकांना आपला जीव गमवावा लागतो काही लोकांना आयुष्यभराचे अपंगाच्या येते. अशा अनेक घटना घडतात. 

अनेक लोक मद्यपान करून वाहने चालवतात. हे रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने आंनदवन व्यसनमुक्ती केंद्र आयोजित 'दारु नको, दुध प्या' संदेश देण्यासाठी कट्टप्पा आणि बाहुबली यांची वेशभूषा करून लोकांना संदेश देण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रबोधन करत आहेत. आज  पुण्यात मराठवाडा मित्र मंडळ, कात्रज डेअरी, गुडलक चौकात लोकांचे प्रबोधन करण्यासाठी बाहूबली आणि कटप्पा पुण्यात दाखल झाले होते. 

Web Title: Bahubali and Katappa gave message of drink milk to punekar