पुणे - हडपसरमधील मगरपट्टा परिसरातील एका बोगस कॉल सेंटरमधून अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल व लॅपटॉपवर ‘मालवेअर’ पाठवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपी युगंधर संजय हादगे (वय ३४, रा. मांजरी) याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी फेटाळला.