बैलगाडा शर्यतींसाठी पुढाकार घेऊ - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

शिक्रापूर - थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आणि बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री आणि केंद्रातील मंत्र्यांसमवेत चर्चा करणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना सरकारच्या उर्वरित सत्ताकाळात हे दोन्ही प्रश्न मार्गी लागलेले असतील, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला, अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

ठाकरे शनिवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी खासदार आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, जयश्री पलांडे, अरुण गिरे, माउली कटके, रवींद्र करंजखिले, ॲड. अविनाश रहाणे आदींची त्यांच्याबरोबर चर्चा झाली. सत्ता आल्यावर भाजपचे मंत्री व नेत्यांनी ‘यशवंत’वर स्वतः:च्या मर्जीतील प्रशासकीय मंडळ नेमले. अनुभवी असलेल्या शिवसेनेच्या खासदार आढळराव यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले आणि आता यशवंतच्या अपयशाचे खापर शिवसेनेवर फोडतात. अशीच स्थिती बैलगाडा शर्यतींची आहे. या प्रश्नीही भाजपकडून तितकेच गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे आपण वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितल्याचे आढळराव म्हणाले.

शिवसेनेचे उमेदवार आढळरावच !
शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारीची अनौपचारिक घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती होईल, नाही होईल. मात्र शिरूर लोकसभेसाठी उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव हेच असून निवडणुकीच्या कामाला लागा, असा आदेशही उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिल्याची माहिती गावडे यांनी दिली.

Web Title: Bailgada Competition uddhav Thackeray Shivajirao Aadhalrao