Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीतील सेकंदाचा निर्णय पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच सेन्सर घड्याळाचा वापर

राज्यात बैलगाडा शर्यतीची शेकडो वर्षाची परंपरा असून गावागावात विविध सण, उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. अलीकडच्या काळात बैलगाडा शर्यतीला मोठे स्वरूप प्राप्त झाले असून शर्यतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
bailgada sharyat first time in bull cart race use sensor watch to identify winner pune
bailgada sharyat first time in bull cart race use sensor watch to identify winner puneSakal

पारगाव : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे आज सोमवार पासून सुरु झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्ह्यात प्रथमच सेन्सर डिजिटल पद्धतीच्या घड्याळाचा वापर करण्यात आला असल्याने गेल्या अनेक वर्षापासून पारंपारिक पद्धतीने बैलगाडा शर्यतीत वापरले जाणारे निशाण व घड्याळ कालबाह्य होणार असून बैलगाडा शर्यतीत आता सेन्सर घड्याळाचा वापर करून बैलगाडा शर्यत पारदर्शक निर्णयाने पार पडणार आहे.

राज्यात बैलगाडा शर्यतीची शेकडो वर्षाची परंपरा असून गावागावात विविध सण, उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. अलीकडच्या काळात बैलगाडा शर्यतीला मोठे स्वरूप प्राप्त झाले असून शर्यतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

राजकीय पुढारी, नेते यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. बैलगाडा शर्यती भरवल्या नंतर अनेकदा वेळेत घड्याळ सुरू केले नाही, निशाण वेळेत टाकले नाही, यावरून शर्यतीत वादविवाद होऊन भांडणे होतात त्यामुळे अनेकदा चालू बैलगाडा शर्यत बंद करावी लागते.

यावर उपाय म्हणून आता अवसरी बुद्रुक येथे सोमवार (दि. २९) जानेवारी ते शनिवार (दि.३) फेब्रुवारी एकूण सहा दिवस होणाऱ्या सेन्सर केसरी २०२४ बैलगाडा शर्यत यात्रा कमिटीच्या वतीने सेन्सर घड्याळाचा वापर केला असून त्यामुळे पारदर्शक यात्रा पार पडणार आहे.

बैलगाडा घाटात सेन्सर घड्याळाचा वापर करताना घाटाच्या खालच्या बाजूला बैलगाडा सोडताना घाटामध्ये गाड्याच्या पंधरा फूट पुढे सात फुटाच्या उंचीवर इलेक्ट्रॉनिक पातळ दोरी बांधली आहे.

घाटाच्या वरच्या बाजूला निशान असलेल्या ठिकाणीही एक दोरी बांधली आहे खालच्या दोरीचे व वरच्या दोरीचे कनेक्शन केबलच्या माध्यमातून जोडले आहे. बैलांच्या वरती सात फुटाच्या उंचीवर दोरी बांधल्याने बैलाच्या पुढील जुकाटाला बांधलेल्या अँटीन्याने ( लोखंडी गज) पहिली दोरी तुटते त्यावेळी घड्याळ सुरू होते.

व घाटाच्या शेवटी असलेल्या ठिकाणी बैलगाडयाने दुसरी दोरी तुटल्यानंतर घड्याळ बंद होते व गाडा किती सेकंदात गेला हे मोठ्या स्क्रीनवर दिसते. सेन्सर पद्धत ही जालना, औरंगाबाद, बुलढाणा या ठिकाणी वापरण्यात येत असुन याचा सराव काही दिवसांपूर्वी येथील घाटात घेण्यात आला होता.

हा प्रयोग यशस्वी झाल्याने अवसरी बुद्रुक येथे होणाऱ्या शर्यतीत या पद्धतीचा वापर सुरु केला आहे. या पद्धतीमुळे पारदर्शक यात्रा पार पडणार असुन घाटात होणारे वाद विवाद बंद होणार असुन बैलगाडा प्रेमी बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक यांना अचूक निर्णय मोठ्या स्क्रीनवर दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com