'बजाज अलियांझ'च्या प्लँकेथॉनची 'गिनीज'मध्ये नोंद

Bajaj Allianz Plankethons Record in Guinness Book
Bajaj Allianz Plankethons Record in Guinness Book

पुणे : 'बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' या भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने प्लँकेथॉन उपक्रमाचे आयोजन केले होते. चांगले आरोग्य राखण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2353 लोकांनी एकाचवेळी एक मिनिट 'अॅब्डॉमिनल प्लँक' स्थिती कायम ठेवत नवा विक्रम रचला. त्यामुळे प्लँकेथॉन या उपक्रमाची आज (रविवार) 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली. 

पुणे येथील एएफएमसी ग्राउंड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राने हजेरी लावली होती. बजाज अलियांझ लाइफच्या प्लँकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या लोकांना शिल्पा शेट्टी प्रोत्साहन देत होती. या नव्या विक्रमाची नोंद करण्यासाठी गिनीजचे अधिकृत निर्णायक रिशी नाथही उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आणि एक मिनिट सर्वांनी एकत्रितपणे ‘सर्वाधिक लोकांनी अॅब्डॉमिनल प्लँक स्थिती करणे’ या श्रेणीसाठी नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स रचल्याचा आनंद घेतला.

बजाज अलियांझ लाइफ प्लँकेथॉन हा कंपनीच्या #36SecPlankChallenge या यशस्वी अभियानातील अंतिम उपक्रम होता. लोकांनी निरोगी राहावे, या उद्देशाने आयोजित केलेल्या सोप्या व धमाल कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे अभियान आखले होते. यामध्ये, 36 सेकंद प्लँक करण्यासाठी लोकांनी त्यांचे मित्र, कुटुंब व सहकाऱ्यांना सोशल मीडियावर आवाहन दिले. गेल्या काही महिन्यांत या अभियानामध्ये, सायना नेहवाल, गीता फोगट व दीपा मलिक अशा खेळाडूंनी, फिटनेसप्रेमींनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व भारतातील कॉर्पोरेट अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

नवा जागतिक विक्रम रचल्यानंतर बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर चंद्रमोहन मेहरा म्हणाले, की ''भारताला जागतिक नकाशावर स्थान देईल, अशी भव्य फिटनेस चळवळ सुरू करण्याची आमची बांधिलकी 'प्लँकेथॉन' उपक्रमातून दिसून येते. जीवनातील विविध उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आरोग्य चांगले असणे अतिशय गरजेचे आहे. #36SecPlankChallenge उपक्रमाच्या यशामुळे आम्हाला हा उपक्रम आणखी पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. तसेच विश्वासार्ह भागीदाराच्या मदतीने आरोग्यविषयक उद्दिष्ट्ये साध्य करत असताना उपलब्ध असणाऱ्या शक्यताही दिसून आल्या''.

शिल्पा शेट्टीने सांगितले, की ''बजाज अलियांझ लाइफने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने #36SecPlankChallenge या उपक्रमाद्वारे अनेक लोकांना आरोग्यदायी उपक्रम सुरू करण्यासाठी आणि व्यायामाच्या दैनंदिन वेळापत्रकाचा आणखी आनंद घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. असंख्य लोकांना यशस्वीपणे एकत्र आणल्याबद्दल व गिनीज रेकॉर्ड रचल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. सक्रिय जीवनशैली कायम राखण्यासाठी या लोकांपैकी अनेकजण यापुढेही यामध्ये सातत्य ठेवतील, अशी मला खात्री आहे. उपक्रम आणखी असंख्य जणांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतील''.

गिनीजचे नाथ म्हणाले, ''आज, गिनीज बुकमध्ये नवा जागतिक विक्रम रचत असताना येथे दिसून आलेला प्रचंड उत्साह पाहणे आनंदकारक व आश्चर्यकारक होते. सर्वाधिक लोकांनी अॅब्डॉमिनल प्लँक स्थिती करणे या श्रेणीमध्ये नवा विक्रम रचल्याबद्दल बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्सचे अभिनंदन''.

बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडविषयी

बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स ही भारतातील एक आघाडीची खासगी विमा कंपनी आहे. ही बजाज समूहासाठी वित्तीय सेवा हाताळणारा व्यवसाय बजाज फिनसर्व्ह लिमिटेड व जगातील आघाडीचा विमा समूह व जगातील एक सर्वात मोठी संपत्ती व्यवस्थापक अलियांझ एसई यांच्यातील संयुक्त भागीदारी आहे.

बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने 2001 मध्ये कार्य सुरू केले आणि आज 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत कंपनीच्या देशात 624 हून अधिक शाखा आहेत. कंपनी आपल्या सक्षम उत्पादनांद्वारे आयुर्विमा उत्पादने उपलब्ध करते व त्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या जीवनातील उद्दिष्टे पूर्ण करता यावीत म्हणून पारंपरिक विमा उत्पादने व युलिप यांचा समावेश आहे. कंपनी समूह विमा व आरोग्य विमा योजनाही उपलब्ध करते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com