Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : सहभागी धावपटूंची लगबग झाली सुरू

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग हॉलमध्ये शुक्रवारपासून एक्स्पो सुरू
bajaj allianz pune half marathon 2023 sakal event at pune registration details distribution kit to participators running fitness test
bajaj allianz pune half marathon 2023 sakal event at pune registration details distribution kit to participators running fitness test Sakal

औंध : सहभागी धावपटूंची शुक्रवारपासून लगबग सुरू झाली. या शर्यतीला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग हॉलमध्ये शुक्रवारपासून एक्स्पो सुरू झाला. नोंदणी केलेल्या धावपटूंनी शिस्तबद्ध पद्धतीने बीब कीट ताब्यात घेतले. स्पर्धक क्रमांक, टी-शर्ट आणि इतर साहित्याचा यात समावेश आहे.

फिटपेजच्या वतीने धावपटूंना तंदुरुस्तीसाठी आणि पूर्वतयारीसाठी अनेक टिप्स देण्यात आल्या. शर्यतींशी संबंधित सर्व माहितीही देण्यात आली. या वेळी पोलिस दल, सैन्यदलातील जवान, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी यांचेही बीब वाटप करण्यात आले.

एक्स्पोमध्ये वेगवेगळ्या स्टॉलला धावपटूंनी भेट दिली. अनेकांनी तेथील साहित्यही खरेदी केले. ब्रुक्स, ॲग्युंटे, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, क्रेकॉल, रग्ड इंडिया, फिटपेज, बजाज लाइफ, सकाळ प्रकाशन व वितरण विभाग यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यास स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला.

bajaj allianz pune half marathon 2023 sakal event at pune registration details distribution kit to participators running fitness test
Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : दिग्गज धावपटूंच्या सहभागामुळे रंगत

स्पर्धकांसाठी बीबचे वाटप उद्या शनिवार (ता.९) सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या वेळी सिंबायोसिसकडून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.

या स्पर्धेत आम्ही संपूर्ण कुटुंब यापूर्वीही सहभागी झालो होतो. स्पर्धेत तंदुरुस्तीबद्दल मार्गदर्शन मिळते. शर्यतीदरम्यान स्पर्धकांची योग्य ती काळजी घेतली जाते. थंडीच्या वातावरणात सहभागी होताना एक वेगळाच उत्साह असतो. यापुढेही आम्ही नेहमीच सहभागी होऊ.

- चंद्रकांत खोसे, बाणेर

आम्ही या स्पर्धेत नेहमीच कुटुंबासह सहभागी होतो. सकाळ माध्यम समूहाचा हा उपक्रम चांगला आहे. ही शर्यत तंदुरुस्तीसाठी चांगला पर्याय आहे. आम्ही मागील एका महिन्यापासून संपूर्ण कुटुंब म्हणून आम्ही धावण्यासाठी सराव करतो आहोत.

- डॉ.अमोल क्षीरसागर, वारजे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com