पिंपरी शहरात बकरी ईद उत्साहात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पिंपरी - अत्तराचा सुंगध आणि अल्लाहचे नामस्मरण अशा वातावरणात शहरातील मशिदी आणि ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली. सामाजिक सलोखा, अल्लाहप्रती निष्ठा, त्याग, समर्पण व मानवतेचा संदेश मौलवींनी दिला.

अलिंगन देऊन मुस्लिम आणि हिंदू बांधवांनी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ईदगाह मैदान परिसर गर्दीने फुलून गेले होते. मोठा पोलिस बंदोबस्त होता. नागरिक व वाहनचालकांच्या सोयीसाठी पोलिसांनी नेहरूनगर येथील ईदगाव मैदान परिसरातील रस्ता बॅरिकेडस्‌ लावून रहदारीसाठी बंद ठेवला होता. दुपारनंतर तो खुला करण्यात आला. 

दरम्यान, नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी बोकडांची कुर्बाणी दिली. नातेवाईक व मित्रमंडळींना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिलेले होते. 

Web Title: Bakrid celebration in pimpri city