Pune News : बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसी दरवर्षी निष्ठेपोटी रिक्षाचालक गेली ४१ वर्ष करतात प्रवाशांची मोफत वहातुक

खडकवाडी गावातील जेष्ठ शिवसैनिक दशरथ बंडु सुक्रे
 Balasaheb Thackeray birthdayloyalty rickshaw pullers  transporting passengers
Balasaheb Thackeray birthdayloyalty rickshaw pullers transporting passengerssakal

पारगाव : आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी गावातील जेष्ठ शिवसैनिक दशरथ बंडु सुक्रे यांनी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी काल सोमवारी दिवसभर स्वताच्या रिक्षातून प्रवाशांची मोफत वहातुक केली.ते गेली ४० वर्षापासून बाळासाहेबांच्या वाढदिवशी कल्याण शहरात प्रवाशांची मोफत वहातुक करत होते बाळासाहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या जयंतीच्या दिवशी ते हा उपक्रम राबवत आहे त्यांचे मोफत प्रवासी वहातुकीचे हे ४१ वे वर्ष आहे.

दशरथ बंडु सुक्रे हे वयाच्या २१ व्या वर्षी नोकरी निमित्ताने मुंबईला गेले ते कल्याण परिसरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करू लागले. त्यांची शिवसेना व हिंदूह्र्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अपार निष्ठा ते गेली ४० वर्षापासून दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कल्याण परिसरातील प्रवाशांची रिक्षातून मोफत वहातुक करत होते. बाळासाहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी हि परंपरा सुरु ठेवली आहे.

यावर्षी दशरथ बंडु सुक्रे वय झाल्याने गावी खडकवाडी येथे आले आहे त्यांनी रिक्षा हि सोबत गावी आणली आहे. काल सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत पारगाव, लोणी, धामणी व मंचर या दरम्यान ३० ते ४० प्रवाशांची मोफत वहातुक केली.

याबद्दल खडकवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जेष्ठ शिवसैनिक अशोक पोखरकर यांच्या हस्ते सत्कार केला यावेळी सरपंच कमल सुक्रे, उपसरपंच एकनाथ सुक्रे, दिलिप डोके, संदीप वाळुंज, गुलाब वाळुंज, विश्वास डोके, आदेश डोके, माऊली कदम , माऊली डोके उपस्थित होते. माजी सरपंच अनिल डोके यांनीही श्री. सुक्रे यांचे अभिनंदन केले आहे.

दशरथ बंडु सुक्रे यांनी कल्याण शहरात रिक्षा धंदा करत असताना २००५ साली पावसाळ्यात कल्याण शहरात पाणीच पाणी झाले होते अनेक दिवस रेल्वे सेवा बंद होती त्यावेळी त्यांनी १५ दिवस मोफत प्रवासी वहातुक केली होती . त्यांच्या रिक्षात अनेकदा प्रवाशांचे विसरलेली दागिन्यांची पर्स, पैशाची पिशवी त्यांनी पुन्हा मुळ मालकाचा शोध घेऊ प्रामाणिकपणे परत केली आहे.

जेष्ठ शिवसैनिक दशरथ बंडु सुक्रे गेली ४० वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी कल्याण शहरात प्रवाशांची मोफत वहातुक करत होते बाळासाहेबांच्या मृत्युनंतर त्यांच्या जयंतीच्या दिवशी ते हा उपक्रम राबवत आहे काल त्यांनी हि परंपरा चालू ठेवली याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com