माझा गटबाजीचा स्वभाव नाही, तुमच्या मनात असेल तर... : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

पुणे: "माझा गटबाजीचा स्वभाव नाही. पण तुमच्या मनात ती आहे का हे महत्त्वाचे आहे. असेल, तर ती काढून मनभेद दूर,' असे आवाहन करतानाच " विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणी काम केले, कोणी नाही हे पाहिले जाणार आहे. ज्याचे माप त्यांच्याच पदात टाकले जाणार आहे,' असा शब्दात काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पक्षाच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला. 
 

पुणे: "माझा गटबाजीचा स्वभाव नाही. पण तुमच्या मनात ती आहे का, हे महत्त्वाचे आहे. असेल, तर ती काढून मनभेद दूर करा,' असे आवाहन करतानाच "विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणी काम केले, कोणी नाही हे पाहिले जाणार आहे. ज्याचे माप त्यांच्याच पदात टाकले जाणार आहे,' असा शब्दात काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पक्षाच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला. 

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर थोरात प्रथमच पुण्यात आले. त्यावेळी शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना थोरात यांनी हा इशारा दिला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे,सोनल पटेल, मुझफर हुसेन, विश्‍वजित कदम, मोहन जोशी, उल्हास पवार, रत्नाकर महाजन, सत्यजित तांबे, शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आज पक्षाची जी परिस्थिती झाली आहे. तशी यापूर्वीही झाली होती. तेव्हा काँग्रेसचे काय होणार असे विचारले जात होते. परंतु त्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, असे सांगून थोरात म्हणाले," आताची लढाई ही विकासाची नाही, तर विचारांची आहे. लोकशाही आणि समता टिकविण्याची आहे. तयारीला वेळ कमी आहे. काळजीपूर्वक कामे करा. विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसले. जसे काम तुम्ही कराल, तसे तुमचे भविष्य असणार आहे. जे जात आहेत, त्यांना जाऊ द्या, नव्यांना संधी मिळते आहे. यंदा अधिकाधिक तरुणांना संधी देण्याचा विचार पक्ष करीत आहे. उद्याचे नेतृत्व त्यातून उभे राहणार आहे.'' 

"आता जीवनमरणाची लढाई आहे,' असे सांगून हर्षवर्धन पाटील म्हणाले," एकदिलाने आणि एकविचाराने काम करावे लागणार आहे.' यावेळी पटेल, बागवे,यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंदे यांनी केले. 

पुणे शहरात आठ विधानसभा मतदार संघ आहेत. सर्व मतदार संघात पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे, असे सांगून मोहन जोशी म्हणाले," काही विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. परंतु कसबा, वडगावशेरी, पर्वती आणि शिवाजीनगर येथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. दिवस कमी आहे. एक महिना आधी उमेदवारी जाहीर करा. बंडखोरी करणार नाही, तुम्ही जो उमेदवार द्याल, त्याच्या मागे आम्ही सर्व उभे राहू.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat in pune for first time as Congress State President