दप्तराचे ओझे होणार कमी; बालभारती राबविणार 'एक पुस्तक' उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

विद्यार्थ्यांची फरपट करणाऱ्या दप्तराच्या ओझ्यावर उपाय योजले जावेत, यासाठी 'सकाळ'ने दप्तराच्या ओझ्याला औषध काय, अशी वृत्तमालिकाही प्रसिद्ध केली होती. त्यानंतर या प्रश्‍नावर सरकारने गांभीर्याने विचार केला. शालेय शिक्षण विभागाला सूचना जारी करण्यात आल्या होत्या. आता सरकारी स्तरावरच कार्यवाही करण्यासाठी पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळाने (बालभारती) एकाच पुस्तकात सर्व विषय देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी हा प्रयोग राबविला जाणार आहे. सुरवातीला राज्यातील 59 गटात हा उपक्रम असेल. 

पुणे : पाठीवरच्या ओझ्याला येत्या शैक्षणिक वर्षापासून औषध मिळणार आहे. या 'आजारा'वर बालभारतीनेच उपाय शोधला असून, एकाच पुस्तकात सर्व विषय दिले जाणार आहेत. प्रायोगित तत्वावर पहिली ते सातवीसाठी ही योजना राबविऱ्यात येणार आहे. पण दप्तरातील वह्या आणि अन्य साहित्यावर कसे नियंत्रण ठेवणार याबाबत कोणतेच निकष निश्‍चित करण्यात आलेले नाहीत. 

येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता...

विद्यार्थ्यांची फरपट करणाऱ्या दप्तराच्या ओझ्यावर उपाय योजले जावेत, यासाठी 'सकाळ'ने दप्तराच्या ओझ्याला औषध काय, अशी वृत्तमालिकाही प्रसिद्ध केली होती. त्यानंतर या प्रश्‍नावर सरकारने गांभीर्याने विचार केला. शालेय शिक्षण विभागाला सूचना जारी करण्यात आल्या होत्या. आता सरकारी स्तरावरच कार्यवाही करण्यासाठी पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळाने (बालभारती) एकाच पुस्तकात सर्व विषय देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी हा प्रयोग राबविला जाणार आहे. सुरवातीला राज्यातील 59 गटात हा उपक्रम असेल. 

आणखी दोन संशयित रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल

पहिल्या टप्प्यात पुढील वर्षी राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाची फलनिष्पत्तीचा विचार करून संपूर्ण राज्यभर एकात्मिक पुस्तक ही संकल्पना राबविली जाणार आहे, असे सांगताना मंडळाचे प्रभारी संचालक विवेक गोसावी म्हणाले, "बालभारतीच्या संकेतसंस्थळावर या विषयी माहिती दिली आहे. एकाच पुस्तकात सर्व विषय घेणार आहोत. जिल्हा परिषदेच्या शाळांना पुस्तके मोफत दिली जात असल्याने पुस्तकाचे तीन भाग झाले, तरी पालक आणि विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.'' 

#PuneCrime : तळजाई वसाहतीत ५० गाड्यांची तोडफोड
 

योजना काय? 
सद्यस्थितीत प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक दिलेले आहे. ती एकत्र घेतल्याने दप्तराच्या वजनात वाढ होते आहे. म्हणूनच प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकाचे तीन भाग करून सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकांचे एकत्रित स्वरूपात तीन स्वतंत्र भागामध्ये पाठ्यपुस्तक तयार होईल. येत्या शैक्षणिक वर्षापासून (2020-21)पहिली ते पाचवी या स्तरावरील विषयांची संख्या कमी असल्याने तीन भाग केले जातील. इयत्ता सहावी व सातवीसाठी विषयांची संख्या जास्त असल्याने आवश्‍यकतेनुसार चार भाग केले जातील, अशी ही योजना आहे. 

इस्रोच्या वैज्ञानिकांसह उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याची आहे? मग 'ही' बातमी वाचा​

पाण्याच्या बाटलीचे काय? 
दप्तरचे प्रमाणापेक्षा अधिक वजन वाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी, स्नायू आखडणे, मणके झिजणे, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, डोकेदुखी, मानसिक ताण असे अनेक आजार निर्माण होत आहेत. यामुळे दप्तराचे विभाजन करणे योग्य असले, तरी विद्यार्थ्यांच्या दप्तरात असलेले जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि खेळाचे साहित्य या वजनाचा विचार जात नाही. विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटल्या घरून नेण्यापेक्षा शाळेत पिण्याचे पाणी भरून देण्याची सक्तीही शाळांवर केली जात नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balbharati will organized One Book program on Trial basis