Agitation for Water : थकलेल्या बालेवाडीकरांचे अधिकाऱ्यांची कारणे ऐकुन पाण्यासाठी ठीया आंदोलन

गेल्या अनेक महिन्यांपासून बाणेर,बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या भागामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने या भागातील नागरिक अगदी मेटाकुटीस आले आहेत.
Agitation for water supply
Agitation for water supplysakal
Summary

गेल्या अनेक महिन्यांपासून बाणेर,बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या भागामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने या भागातील नागरिक अगदी मेटाकुटीस आले आहेत.

बालेवाडी - गेल्या अनेक महिन्यांपासून बाणेर,बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या भागामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने या भागातील नागरिक अगदी मेटाकुटीस आले आहेत. मागच्या आठवड्यात,काही भागात तर लागोपाठ सहा दिवस पाणीच आले नव्हते. अनेकदा निवेदन देऊन सुद्धा पाणीपुरवठया मध्ये बदल नाही, त्यामुळे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन चांदणी चौक येथे ठिया आंदोलन केले .

गेल्या अनेक महिन्यांपासून बाणेर, बालेवाडी, सुस,म्हाळुंगे, सुतारवाडीया भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यासंदर्भात (१ जुलै २०२२) रोजी सर्वच नगरसेवकांनी एकत्र येऊन महापालिका आयुक्त विक्रम कुमार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व पाणी पुरवठा विभाग अधिकारी तसेच या भागातील नागरिक यांची एकत्रितपणे बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लागेल याबद्दल आश्वासन दिले होते.पण या गोष्टीला सहा महिने होत आले तरी, हा पाणी प्रश्न जैसे थेच आहे. भर पावसाळ्यातही या भागात पाणी प्रश्न भेडसावत होताच, त्यामुळे काही महिन्यापूर्वी संतप्त नागरिकांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना बालेवाडीतील मंदिरामध्ये कोंडून ठेवले होते.

पाणी प्रश्न गंभीर असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते आहे, याबाबत विचारणा केली असता दर वेळी वेगळं कारण दिले जात. अधिकाऱ्यांची कारण ऐकुन घेत पुर्ण वर्षभरच या भागांतील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे, पण आता मात्र अजून पाणी प्रश्न सुटत नसल्याने भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली या भागाला पाणी पुवठा करणाऱ्या चांदणी चौक येथिल टाकीवर जाऊन ठीया आंदोलन केले. येथे आंदोलकानी बाणेर बालेवाडला जाणाऱ्या पाण्याचा व्हॉल्व ही फिरवून ठेवला आहे. तसेच इथे हलगी वाजवत नंदीबैलाला आणून पाणी पुरवठा अधिकारी व प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर, पदाधिकारी गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, शशिकांत बालवडकर, यांच्यासह बाणेर बालेवाडी भागातील नागरिक तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पाणीपुरवठा अधिकारी हे आंदोलनाच्या ठिकाणी आले असता त्यांना बाणेर, बालेवाडी येथे पाणी कुठल्या टाकीतून येते, वॉल्व्ह किती फिरवावा लागतो, मोटार किती एच. पी. ची आहे हेही सांगता आले नाही.

आमच्या संपुर्ण भागाला डिसेंबर २०२१ पर्यंत नियमित पाणी पुरवठा होत होता, गेल्या वर्षभरात हा प्रश्न भेडसावतो आहे, आणि आम्हाला दरवेळी वेगवेगळी कारणच दिली जातात. धरण भरलेली असताना, केवळ प्रशासकीय नियोजन नसल्याने आम्हाला पाणी नाही. जो पर्यंत आम्हांला पुर्वी प्रमाणे पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही हे ठीया आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.

- माजी नगरसेवक अमोल बालवडकर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com