Balewadi News : बालेवाडी येथील सार्वजनिक शौचालय मेट्रोच्या कामामुळे जमीनदोस्त

येथील बालेवाडी हाय स्ट्रीट येथे महानगरपालिकेने सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी )व्यवसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून कमिन्स इंडिया कॅम्पस बालेवाडी शाखा यांच्याकडून सार्वजनिक शौचालय बांधून घेतले होते.
balewadi high street toilets demolish due to metro work development pune
balewadi high street toilets demolish due to metro work development puneSakal

बालेवाडी : येथील बालेवाडी हाय स्ट्रीट येथे महानगरपालिकेने सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी )व्यवसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून कमिन्स इंडिया कॅम्पस बालेवाडी शाखा यांच्याकडून सार्वजनिक शौचालय बांधून घेतले होते.

या भागात सकाळी संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना, महिलांना याचा वापर करता येत होता .परंतु येथे मेट्रो स्थानकाच्या पाहिऱ्या येत असल्याने हे शौचालय पूर्णपणे पाडण्यात आले आहे.

बालेवाडी येथील कमिन्स इंडिया कॅम्पस बालेवाडी शाखा यांच्याकडून काही वर्षांपूर्वी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) म्हणजेच व्यावसायिक सामाजिक जबाबदारीतून बालेवाडी हाय स्ट्रीट येथे नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय बांधून देण्यात आले होते.

परंतु चार दिवसांपूर्वी हे शौचालय पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्याचे पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण बालेवाडी हाय स्ट्रीट या भागामध्ये अनेक लहान मोठे हॉटेल , महापालिकेकडून विकसित केलेले खेळाचे मैदान असल्याने या भागात अनेक मुलं-मुली खेळण्यासाठी येत असतात.

तसेच रस्ता प्रशस्त असल्याने सकाळी व संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिक व महिलांची संख्या मोठी असते. त्यामुळे नागरिकांना या शौचालया चा वापर करता येत होता. परंतु हे शौचालय पाडल्यामुळे या सगळ्यांनाच गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे.

संपूर्ण बाणेर बालेवाडी भागात रस्त्याच्या कडेला फक्त तीन सार्वजनिक शौचालय होती . त्यातील बाणेर रस्त्यावर फक्त एकच सुरू आहे. दुसरे स्मार्ट सिटी कडून बालेवाडी येथे महिलांसाठी सुरू केलेले शौचालय हे रस्त्यांच्या कामामुळे काही महिन्यातच बंद केले गेले, ते पुन्हा सुरू केले गेलेच नाही आणि आता हे बालेवाडी हाय स्ट्रीट चे शौचालय ,

मेट्रोच्या कामामुळे जमीनदोस्त करण्यात आले आहे .सर्व सोयी सुविधांनी समृद्ध असलेल्या बाणेर बालेवाडी भागांमध्ये नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय नाही ही खेदाची गोष्ट म्हणावी लागेल. त्यात स्वच्छ सर्वेक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या पुणे महापालिकेतच अशी परिस्थिती असेल तर काय बोलायचे? अशा प्रतिक्रिया या भागातील नागरिक देत आहेत.

बाणेर बालेवाडी भागांमध्ये सार्वजनिक

शौचालयांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विशेषतः स्त्रियांना याचा त्रास जाणवतो. येथे जी शौचालय होती ती ही पाडण्यात आली असल्यामुळे या भागातील नागरिकांना याचा त्रास होतो. तरी लवकरात लवकर या भागात सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावीत.

बाळासाहेब दंडवते , बालेवाडी

येथे मेट्रो स्थानकाच्या पाहीऱ्या येत असल्यामुळे शौचालय पाडण्यासाठी पीएमआरडीए कडून निवेदन देण्यात आले होते. हे शौचालय पाडून याचं भागात दुसरे शौचालय बांधण्यासाठी एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे . याचं भागात जागा निश्चित करून शौचालय बांधण्यात येईल.

गिरीश दापकेकर. सहाय्यक आयुक्त ,औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com