विजयाचा गुलाल उधळला आणि टपालाने मतपत्रिका आली!

Ballot papers by post Received After Victory Pune gram panchayt election
Ballot papers by post Received After Victory Pune gram panchayt election

केडगाव(पुणे) : मतदान १५ जानेवारीला आणि मतपत्रिका मिळाली १८ जानेवारीला. त्यामुळे पारगाव (ता. दौंड) येथील दोन जणांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. राजाराम शिंदे (रा. गोपाळवाडी ता.दौंड ) व आबासाहेब आभाळे (रा. नगर ) हे पारगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षक आहेत. त्यांच्या मतदान पत्रिका 18 जानेवारीला दुपारी दिड वाजता पारगाव येथील शाळेत पोहचल्या. आभाळे व शिंदे यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झाल्याने त्यांना टपाली मतदान करायचे होते.

पाकिटावर तीन तारखांचे शिक्के
दौंड तहसील कार्यालयाने आयोजित केलेल्या पहिल्या प्रशिक्षण दरम्यान त्यांनी टपाली मतदानाचे प्रक्रिया पार पाडली होती. या प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना त्यांच्या शाळेत टपाली मतपत्रिका टपालाने मिळणार होत्या. प्रक्रिया पार पाडून अनेक दिवस झाले तरी, मतपत्रिका आली नसल्याने शिंदे व आभाळे यांनी याबाबत दौंड येथे निवडणूक शाखेत याबाबत चौकशी केली मात्र, 'प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तुम्हाला टपालाने मतपत्रिका मिळेल,' असे सांगण्यात आले. निवडणुकीच्या दिनक्रमामुळे शिंदे व आभाळे यांना मतपत्रिकेचा जास्त पाठपुरावा करता आला नाही. या दोघांच्या मतपत्रिका मतमोजणी दिवशी मिळाल्या. टपालाच्या पाकिटावर १२, १५ व १८ तारीख असे तीन शिक्के आहेत.

याला जबाबदार कोण?
मतदान झाले. मतमोजणी झाली. विजयाचा गुलालही उधळला गेला आणि त्यानंतर मतपत्रिका मिळतात हे पाहून शाळेतील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिंदे यांच्या भावजय रोहिणी शिंदे या गोपाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार होत्या. त्या विजयी झाल्या आहेत. भावजयीला मतदान करू न शकल्याची खंत शिंदे यांना बोचत आहे. मात्र, याला जबाबदार कोण निवडणूक यंत्रणा की, टपाल यंत्रणाबाबत चौकशी होण्याची मागणी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com