भुशी डॅम परिसरात अवजड वाहनांना शनिवार, रविवार बंदी

bhushi.jpg
bhushi.jpg

लोणावळा (पुणे) : लोणावळ्यात वीकेंडला होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शनिवारी (ता. 20) आणि रविवारी (ता. 21) भुशी धरण, लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावर बस व अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. लोणावळ्यात सध्या पावसाळी हंगाम जोमात आहे.

वर्षाविहार व पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावर भिजण्यासाठी पर्यटकांची ओसंडून गर्दी होत आहे. पर्यटकांची वाढती संख्या आणि त्यांच्या वाहनांमुळे लायन्स पॉइंट, भुशी ते लोणावळा दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागत आहे. याचबरोबर पुणे-मुंबई महामार्ग व शहरातील अंतर्गत रस्तेही फुल्ल होत आहेत. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना रस्त्याने चालणेही मुश्‍किल होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com