न्यायालयामध्ये गर्दी कमी होईना; जिल्हा न्यायाधीशांनी घेतला महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाने अवघ्या जगात धुमाकूळ घातला असून हजारो नागरिकांचे प्राण घेतले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध कामांच्या निमित्ताने हजारो पक्षकार, वकील आणि नागरिक न्यायालयात दाखल होत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने न्यायालयाच्या कामकाजात बदल करण्यात आला असून सध्या सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेतच न्यायालयाचे काम सुरू आहे. यावेळी फक्त महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा न्यायल्यातर्फे पक्षकार, वकिलांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले.

पुणे : वेळोवेळी आवाहन करूनही न्यायालयातील गर्दी कमी होत नसल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी बुधवारपासून (ता. 20) न्यायालयामध्ये पक्षकारांना प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र, जमिनीच्या आदेशानंतर फक्त एकाच जामीनदाराला न्यायालयात जाऊ शकणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

कोरोनाने अवघ्या जगात धुमाकूळ घातला असून हजारो नागरिकांचे प्राण घेतले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध कामांच्या निमित्ताने हजारो पक्षकार, वकील आणि नागरिक न्यायालयात दाखल होत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने न्यायालयाच्या कामकाजात बदल करण्यात आला असून सध्या सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेतच न्यायालयाचे काम सुरू आहे. यावेळी फक्त महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा न्यायल्यातर्फे पक्षकार, वकिलांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले. गरज असेल तरच पक्षकारांना बोलवा असे, वकिलांना सांगण्यात आले. मात्र तरी देखील न्यायालयात पक्षकारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या आवारात पक्षकारांना प्रवेश देण्यात निर्णय न्यायालय प्रशासनाने घेतला आहे. ज्या वकीलांचे काम नाही त्यांनी न्यायालयात जाऊ नये. तसेच पक्षकारांना आत सोडण्यासाठी कोणीही आग्रह करू नये, असा आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

''न्यायालयाच्या आवारात काही नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. काही आरोपींना भेटण्यासाठी शेकडो लोक न्यायालयात दाखल झाले होते. तसेच काही वकिलांनी विनाकारण पक्षकारांना बोलावले होते. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता न्यायालयात होणारी गर्दी ही चिंताजनक आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या आवारात कोणत्याही पक्षकाराला प्रवेश देण्यात येणार नाही. फक्त जमीन झाल्यावर समबंधीत जामीनदाराला आत सोडण्यात येईल. तसेच ज्या वकिलांचे काम आहे त्यांनीच न्यायालयात यावे.''
- ऍड. सतीश मुळीक अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

पुण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यु


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban to parties from entering court