बाणेर- बालेवाडीतील नागरिकांनी रस्त्यांवर केलीये गर्दी पण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातही पुन्हा 13 ते  23 जुलै असे दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पहिले पाच दिवस कडक लॉकडाऊन असल्यामुळे बाणेर बालेवाडी भागातील नागरिक भाजी, फळ, किराणा, घरातली इतर जीवन आवश्यक वस्तू घेण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडल्याचे चित्र होते.

बालेवाडी (पुणे) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातही पुन्हा 13 ते  23 जुलै असे दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पहिले पाच दिवस कडक लॉकडाऊन असल्यामुळे बाणेर बालेवाडी भागातील नागरिक भाजी, फळ, किराणा, घरातली इतर जीवन आवश्यक वस्तू घेण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडल्याचे चित्र होते. त्यामुळे सगळ्या बाणेर बालेवाडी येथील रस्त्यांवरून आणि सगळ्या दुकानांमध्ये गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. याशिवाय हे लॉकडाऊन 13 तारखेच्या पहाटे की  14 तारखेच्या पहाटे सुरू होणार असा संभ्रम असल्याचेही पाहायला मिळाले. सगळे दुकानदार याबद्दल एकमेकांमध्ये विचारपूस करून शहानिशा करत असल्याचेही दिसले.          

बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्ण वाढताहेत; आता आणखी...

पुणे शहर तेसच पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा दहा दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला, पहिल्या पाच दिवसांमध्ये किराणा, भाजीची  दुकान ही बंद असल्यामुळे नागरिक शनिवारी सकाळी घरातून बाहेर पडून भाजी, किराणा, इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करत आहेत. शिवाय मागे जसे लॉकडाऊन वाढत गेले तसे परत वाढते की काय अशी भीती मनात असल्यामुळेही नागरिक घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत. कोरोनामुळे एवढे दिवस काही प्रमाणात कमी झालेली बाणेर रस्त्यावरची वाहनांची गर्दी, आज जरा जास्तच पाहायला मिळाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही ठिकाणी दुकानातून वस्तू खरेदी करताना,  नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत,  मास्क वापरताना दिसत आहे,  तर काही ठिकाणी मात्र नियमांचे उल्लंघन होतानाही दिसत आहे. काही नागरिकांनी मास्क घातले आहे पण ते नाकावर नाहीतर गळ्यात आहे किंवा बोलताना अधून मधून मास्क काढून बोलणे असे चित्र दिसत होते. याशिवाय दुकानदारांमध्ये लॉक डाऊन नक्की कधी सुरू होणार आहे म्हणजे 13 तारखेच्या पहाटेपासून की 13 तारखेच्या रात्रीच्या बारा वाजल्या पासून असा  संभ्रम निर्माण झालेले ही  पाहायला मिळाला. दुकानदार एकमेकांना फोन करून विचारत आहेत  आणि शहानिशा करून घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baner- Balewadi Citizens of crowded the streets