

Hinjewadi Shivajinagar Metro Baner Balewadi Residents Protest Against 17 Station Launch Demand Inclusion of Local Stations
esakal
-शीतल बर्गे
बालेवाडी : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो फेज लाईन तीन मार्गावरील केवळ १७ स्थानकांवर ३ नोव्हेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्याच्या नियोजनाला विरोध करत बाणेरमधील नागरिकांनी आज हाबाजी सायकर (गणराज) चौक येथे तीव्र आंदोलन केले. बाणेर-बालेवाडी परिसरातील मेट्रो स्थानक सुरू केल्याशिवाय मेट्रो सेवा सुरू करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.