Baramati Bank : बारामती बँकेला 67 कोटींचा ढोबळ नफा - सचिन सातव

बारामती सहकारी बँकेने 31 मार्च 2024 अखेर 3584 कोटींचा व्यवसाय करीत 67 कोटी 40 लाख रूपये तरतूदीपुर्व ढोबळ नफा प्राप्त केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.
Baramati Bank
Baramati Bank Sakal

बारामती- येथील बारामती सहकारी बँकेने 31 मार्च 2024 अखेर 3584 कोटींचा व्यवसाय करीत 67 कोटी 40 लाख रूपये तरतूदीपुर्व ढोबळ नफा प्राप्त केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. बँकेचा निव्वळ एनपीए 2.40 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश आले आहे.

बँकेच्या आजवरच्या मिळालेल्या ढोबळ नफ्यामध्ये यंदाचा ढोबळ नफा विक्रमी असून, सर्व तरतुदी पुर्ण करीत बँकेने 5 कोटी 70 लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेचे नक्त मुल्य 154 कोटींवर पोहोचले आहे. बँकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसुली करत एनपीएचे (अनुत्पादक जिंदगी) प्रमाण कमी करण्यात यश प्राप्त केले आहे.

बँकेच्या ठेवी 2155 कोटी 26 लाख रुपये असून कर्ज वाटप 1428 कोटी 97 लाख रुपये इतके झालेले आहे. बँकेचा CRAR 14.09 टक्के आहे. बँकेचा ढोबळ एनपीए 10.94 टक्के असून निव्वळ एनपीए 2.40 टक्के आहे. बँकेने एनपीएची 80 टक्के तरतूद केली आहे.

बँकेचे पुणे, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, रायगड अशा सहा जिल्हयांत कार्यक्षेत्र असून, बँकेच्या 36 शाखा व एक विस्तारित कक्ष आहे. नेट बँकिंगची सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच रिझर्व्ह बँकेकडून नेट बँकिंगची परवानगी मिळेल, असे सचिन सातव यांनी सांगितले.

उपाध्यक्ष किशोर मेहता, अॅड. शिरीष कुलकर्णी, रोहित घनवट, देवेंद्र शिर्के, उध्दव गावडे, नुपूर शहा (वडूजकर), डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, विजय गालिंदे, नामदेव तुपे, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, जयंत किकले, रणजित धुमाळ, तज्ज्ञ संचालक प्रीतम पहाडे, डॉ. अमोल गोजे, अॅड. रमेश गानबोटे, शांताराम भालेराव, कार्यकारी संचालक रवींद्र बनकर, मुख्य सरव्यवस्थापक विनोद रावळ, सरव्यवस्थापक सोमेश्वर पवार व विजय जाधव यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com