बॅंक संचालकाची पाण्यासाठी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

वालचंदनगर (जि. पुणे) - नीरा डावा कालव्यातून गेली दोन वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा. बेलवाडी, ता. इंदापूर) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 

दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या दोन चिठ्ठ्या वसंत पवार यांच्या पॅंटच्या मागील खिशात प्लॅस्टिक पिशवीत ठेवलेल्या आढळून आल्या. त्यात आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, चिठ्ठीत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावांचा समावेश आहे. शनिवारी दुकान बंद केल्यानंतर ते घरी आले नव्हते.

Web Title: bank director suicide for water