बॅंक फसवणूकप्रकरणी आणखी तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रची सुमारे 6 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली. या आरोपींनी युनिफाइंड पेमेंट इंटरफेल (यूपीआय) या मोबाईल ऍपद्वारे बॅंकेच्या विविध शाखांतून ही रक्कम काढली. या आरोपींची न्यायालयाने 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

याप्रकरणी बॅंकेचे विभागीय उपव्यवस्थापक निरंजन पुरोहित यांनी फिर्याद दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी राजेश सत्यनारायण काबरा (वय 47, रा. हडपसर), पंकज राजेंद्र पिसे (वय 28, रा. रायकर मळा, धायरी) यांना 11 मार्च रोजी अटक केली आहे. ते दोघे पोलिस कोठडीत आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी अशोक बबनराव हांडे (वय 49, रा. पिंपळगाव, जुन्नर), दिनेश सयाजी मोढवे (वय 41, रा. मढ, जुन्नर), संतोष प्रकाश शेवाळे (वय 37, रा. शिक्रापूर, शिरूर) यांना रविवारी अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. आनंद लाहोटी, विनोद नायकोडी, महेंद्र डोमसे, गणेश डोमसे, स्वप्नील विश्‍वासराव या आरोपींचा शोध सुरू आहे. 

आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली सीम कार्ड जप्त करायची आहेत; तसेच फसवणुकीची रक्कम हस्तगत करायची आहे, अशी माहिती सहायक सरकारी वकील विद्या विभुते यांनी न्यायालयास दिली. "ऍप'चा गैरवापर केला असून, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सखोल तपासाची आवश्‍यकता असल्याचे विभुते यांनी नमूद केले. 

Web Title: bank fraud case