बँक ऑफ महाराष्ट्रने कमावला 72.34 कोटी रूपयांचा निव्वळ नफा

bom
bom

पुणे: बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी आर्थिक वर्ष 2018-19 च्या चौथ्या तिमाही अखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमंत टम्टा उपस्थित होते.

यावेळी बोलताना ए. एस. राजीव म्हणाले की, सर्वांगीण आर्थिक कामगिरी सुधारण्यासाठी बँक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बँकेची कामगिरी अधिक गुणवत्तापूर्ण होण्यासाठी संरचनात्मक, पद्धतशीर, आणि कौशल्याचे बदल बँक करत आहे आणि या बदलांमुळे आर्थिक गुणवत्तेमध्ये सुधार झालेला आहे. कार्यक्षमतेमध्ये सुधार, कृषी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) तसेच किरकोळ (रिटेल)कर्जे (RAM-Retail, Agri& MSME) याबरोबरच कर्ज वसुलीसाठी मूल्यवर्धित उपायांचे सशक्तीकरण आणि वृद्धी करून ग्राहक, हितचिंतक आणि भागधारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढण्यावर बँकेने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

कामगिरीची ठळक वैशिष्टे: (तिमाही)

 नफा
 - गत आर्थिक वर्ष 2018 च्या चौथ्या तिमाहीस बँकेस झालेल्या रुपये 113.49 कोटी तोट्याच्या पार्श्वभूमीवर बँकेने आर्थिक वर्ष 2019 अखेर चौथ्या तिमाहीस रुपये 72.34 कोटी रुपये निव्वळ नफा कामावला आहे.

- आर्थिक वर्ष 2019 च्या चौथ्या तिमाहीस कार्यान्वयम नफा रु 501 कोटी झाला असून गतवर्षी 31 मार्च 2018 अखेरीस कार्यान्वयन नफा 547 कोटी रुपये होता. कार्यान्वयन नफ्यातील घट ही मुलत: AS-10 च्या सुधारित मार्गदर्शकांप्रमाणे करण्यात आलेल्या रु 82 कोटीच्या अधिकच्या मालमत्तांच्या पुनर्मुल्यांकनाच्या घसार्‍यामधील फेरबदलामुळे झाली आहे.

- आर्थिक वर्ष 2019 च्या चौथ्या तिमाहीस निव्वळ व्याज उत्पन्न रु 1000 कोटी झाले असून गतवर्षी 2018 च्या चौथ्या तिमाही अखेरीस हे उत्पन्न 881 कोटी रुपये होते. ही वाढ 13.47% आहे.

- निव्वळ व्याजामधील अंतर (नेट इंटरेस्ट मार्जिन) 23 बीपीएसने वर गेले असून ही वाढ गतवर्षी 2018 च्या चौथ्या तिमाही अखेरीच्या 2.41% वरून यावर्षी 2019 च्या चौथ्या तिमाही अखेर 2.64% झाली.  

- व्याज-व्यय मध्ये चांगली घट झाली असून 31 मार्च 2018 च्या चौथ्या तिमाहीस झालेल्या रु 1,811.20 कोटी वरून 31 मार्च 2019 च्या चौथ्या तिमाहीस 1,775.27 कोटी रुपये (-1.98%) झाली आहे. व्याजाच्या खर्चामधील घट ही मुख्यत्वे वाढलेल्या कासा ठेवी (बचत आणि चालू खाते ठेवी) आणि मोठ्या व्याजाच्या कर्जाच्या जसे की पुनर्वित्त, टायर 1/टायर 2 बॉन्डस यांच्या  परताव्यांमुळे झाली आहे.  

- ठेवींचे मूल्य गतवर्षीच्या 5.31% वरून खाली येवून आर्थिक वर्ष अखेर 31 मार्च 2019 ला 4.99% झाले आहे.

- मुल्याचे उत्पन्नाशी असलेल्या गुणोत्तरामद्धे आर्थिक वर्ष 2017-18 च्या 57.39% तुलनेत वाढ होवून हे गुणोत्तर 63.83 % झाले आहे. ही वृद्धी मुख्यत्वे मालमत्तेच्या डिप्रीसीएशन (अर्थात मूल्यातील उतार) रु 82 कोटी आणि प्रलंबित वेतनवृद्धीसाठी केलेल्या तरतुदीमुळे झालेला आहे.

व्यवसाय

- 31 मार्च् 2019 ला बँकेचा एकूण व्यवसाय रु. 2,34,117 कोटी झाला आहे. गतवर्षी 31 मार्च ला एकूण व्यवसाय रु 2,33,626 कोटी होता.

- गतवर्षीच्या मार्च अखेरीस एकूण कर्जे रु 94,645 कोटींच्या तुलनेत 31 मार्च 2019 अखेरीस रु 93,467 कोटी आहेत.

- महत्वाची किरकोळ कर्जे या प्रभागामध्ये वाढ झाली असून 31 मार्च 2018 अखेरीच्या रु 16,547 कोटी रुपयांच्या तुलनेत या वर्षी 31 मार्च 2019 ला 18,805 कोटी रुपये झाली असून ही वाढ 13.65% इतकी आहे.

- एकूण किरकोळ कर्जामध्ये गृहकर्जाचे प्रमाण 64% आहे.

- कृषी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) तसेच किरकोळ (रिटेल)कर्जे (RAM-Retail, Agri& MSME ) यांचे एकूण कर्जाच्या तुलनेत प्रमाण गतवर्षीच्या 50% वरून यावर्षी 31 मार्च 2019 ला 51% झाले आहे. 

- 31 मार्च 2018 ला बँकेच्या एकूण ठेवी रुपये 1, 38,981 कोटी होत्या त्यात वाढ होवून 31 मार्च 2019 ला 1, 40,650 कोटी रुपये झाल्या.

- वर्ष 2018 मार्च मधील कासा (बचत आणि चालू जमा खाते) ठेवीमध्ये 47.74% वरून 1.91% वाढ होवून 31मार्च2019 मध्ये 49.65% कासा ठेवी झाल्या आहेत.

- एकूण गुंतवणुकीमध्ये रु 16001 कोटीची वाढ झालेली आहे. दिनांक  31मार्च2018 ला एकूण गुंतवणूक रु 44,163 कोटी होती जी की दिनांक  31 मार्च 2019 ला 60,164 कोटी रुपये झाली आहे.

थकीत कर्जे व्यवस्थापन :

- बँकेच्या एकूण थकीत कर्जामध्ये रुपये 3,109 कोटीची घट झालेली असून 31मार्च2018 लाच्या रुपये 18,433 कोटी रुपयांच्या तुलनेत 31 मार्च 2019 ला रुपये 15,324 कोटी झाली आहेत. एकूण थकीत कर्जे आणि निव्वळ थकीत कर्जाचे प्रमाण दिनांक 31 मार्च 2019 ला 16.40% आणि 5.52% आहे जे 19.48% आणि 11.24% हे प्रमाण दिनांक 31मार्च2018 ला होते.

- बँकेच्या निव्वळ थकीत कर्जामध्ये 53% ने घट झालेली आहे. दिनांक 31मार्च2018 ला एकूण थकीत कर्जे रुपये 9,641 कोटी होती ती आता दिनांक 31 मार्च 2019 ला रुपये 4,559 कोटी आहेत.

- संरक्षक तरतूद गुणोत्तरामध्ये (प्रोव्हिजन कव्हरेज रेशो) लक्षणीय वर्धित सुधारणा झाली आहे. दिनांक 31मार्च2018 ला हे गुणोत्तर 58.71% आणि 31 मार्च 2019 ला त्यात वाढ होवून ते 81.49% इतके झाले आहे. जी समकक्ष बँकांमध्ये सर्वात उच्च आहे.

भांडवल पर्याप्तता :

- बँकेने सीईटी-1 भांडवल आणि सीआरएआर (CRAR) गुणोत्तर प्रमाण किमान विहित प्रमाणापेक्षा जास्त राखले आहे. बँकेचे सीईटी-1 भांडवल (सी सी बी सह) दिनांक 31 मार्च 2019 ला 9.88% राहिले असून दिनांक 31मार्च2018 ला हे प्रमाण 8.97% होते. 

- 86 बी पी एस ने सीआरएआर(CRAR)मध्ये सुधारणा झालेली आहे. दिनांक 31 मार्च 2019 ला सीआरएआर CRAR) 11.86% तर दिनांक 31मार्च2018 ला 11% होते.

कामगिरीची ठळक वैशिष्ठ्ये (वार्षिक आधारावर):

- बँकेचा कार्यान्वयन नफ्यामध्ये आर्थिक वर्ष 2018 च्या रुपये 2,191 कोटी च्या तुलनेत किरकोळ वाढ होवून तो आर्थिक वर्ष 2019 मध्ये रु. 2,198 कोटी झाला आहे.

- मार्च 31, 2019 च्या वर्ष समाप्तीस निव्वळ तोटा रु. 4,784 कोटी झाला असून 31मार्च2018 वर्ष समाप्तीस तो 1,146 कोटी होता.

- तोट्यामधील ही वाढ मोठ्या कर्जाच्या दोषात्मक मालमत्तांवरील तरतुदीमुळे झाली आहे.

- AS-10 च्या सुधारित मार्गदर्शकांप्रमाणे करण्यात आलेल्या मालमत्तांच्या पुनर्मुल्यांकनातील घसार्‍यामधील फेरबदलामुळे तोट्यामधील ही वाढ झाली आहे.

- वेतनवृद्धीसाठी केलेल्या रु 109.80 कोटीच्या तरतुदीमुळे झालेला आहे.

- आर्थिक वर्ष 19 मध्ये गतवर्षाच्या निव्वळ व्याज उत्पन्नाच्या तुलनेत 10.14% ने वाढ झालेली आहे. आर्थिक वर्ष 19 मध्ये निव्वळ व्याज उत्पन्न रु. 3,390 कोटी तर आर्थिक वर्ष 18 मध्ये रु. 3,733 कोटी होते.

- गैर व्याजेतर उत्पन्नामद्धे गुंतवणुकीच्या विक्रीमधील मंद लाभ असूनही आर्थिक वर्ष 18 च्या रुपये 1,506 कोटीच्या तुलनेत किरकोळ वृद्धी होवून आर्थिक वर्ष 19 मध्ये हे उत्पन्न रु. 1,547 कोटी इतके झालेले आहे.

- निव्वळ व्याजामधील अंतर (NIM) 21 बेसिस पॉईंट्सने वाढून आर्थिक वर्ष 18 च्या 2.32% च्या तुलनेत आर्थिक वर्ष 19 मध्ये 2.53% झाले आहे.

- ठेवींचे शुल्क 32 बेसिस पॉइंटने कमी झाले असून आर्थिक वर्ष 18 च्या 5.31% च्या तुलनेत आर्थिक वर्ष 19 मध्ये 4.99% झाले आहे. देयतांच्या-ठेवींच्या (लायेबिलिटीज) उत्तम व्यवस्थापणामुळे आणि जास्त मूल्यांच्या ठेवींमध्ये घट करण्याने ठेवींचे शुल्कात ही घट होवू शकली.

- निधीवरील खर्च 41 बेसिस पॉईंट्सने कमी झाला आहे. आर्थिक वर्ष 18 मध्ये 4.88% च्या तुलनेत तो आर्थिक वर्ष 19 मध्ये 4.47% झाला. निधीवरील खर्चाची कपात ही ठेवींच्या उत्तम व्यवस्थापणामुळे आणि उच्च मूल्यांच्या ठेवींच्या परताव्यामुळे शक्य झाली.

- वर्ष 2017-18 मधील बुडीत कर्ज खात्यातील वसूली ही वर्ष 2017-18 मध्ये रु 138 कोटी झालेली होती तर या आर्थिक वर्ष समाप्तीस ही वसूली 245 कोटी रुपये होवून 77% वाढ दर्शवली आहे.

भविष्यासाठी योजना:

- गुणवत्तापूर्ण कॉर्पोरेट कर्जे, कृषी कर्जे, किरकोळ कर्जे आणि लघु तसेच मध्यम उद्योगांच्या कर्जांवर अधिक लक्ष केंद्रीत करणे.

- वसुलीसाठी अथक प्रयत्न करणे आणि खासकरून बुडीत कर्जांच्या वसुलीवर लक्ष देणे आणि नवीन कर्जांच्या थकीत होण्यापासून (स्लीपेजेसपासून) बचाव करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणे.

- गैर व्याजेतर उत्पन्न वाढीवर लक्ष केन्द्रित करणे आणि कार्यान्वयन खर्चावर नियंत्रण ठेवणे.

- लाभाप्रदतेमध्ये आणि भागधारकांच्या परताव्यामध्ये सुधारणा करून वाढ करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com