फुरसुंगीत दोन दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्रचे काम काज ठप्प

बँकेत येणाऱ्या बीएसएनएल ची लाईन तुटल्याने दोन दिवसांपासून बँकेच्या फुरसुंगी शाखेचे सिस्टीम बंद झाली आहे
Bank of Maharashtra closed for two days
Bank of Maharashtra closed for two dayssakal

-अभिजित कुचेकर

फुरसुंगी : बँक ऑफ महाराष्ट्र फुरसुंगी शाखेचे काम काज दोन दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.बँकेत येणाऱ्या बीएसएनएल ची लाईन तुटल्याने दोन दिवसांपासून बँकेच्या फुरसुंगी शाखेचे सिस्टीम बंद झाली आहे. त्यामुळे बँकेतील सर्व व्यवहार बंद झाले आहेत. ग्राहकांना पासबुक भरणे,पैसे काढणे,पैसे भरणे अशी कोणतेही काम करता येत नाहीत.ग्राहकांना दोन दिवसापासून कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

"वडील जेष्ठ नागरिक असल्याने त्यांचे पासबुक भरण्यासाठी गेले दोन दिवस येत आहे,परंतु संघनकच बंद असल्याने पुन्हा माघारी जावे लागत आहे.त्यांची पेन्शन जमा झाली,आहे की नाही हे समजू शकत नाही.बँक कधी पूर्ववत चालू होईल याची खात्रीशीर माहिती अधिकाऱयांकडून मिळत नसल्याने कती दिवस हेलपाटे मारावे लागतील सांगता येत नाही."असे खातेदार अनिल पवार यांनी सांगितले.

आशितोष शर्मा (शाखा व्यवस्थापक,फुरसुंगी शाखा, बॅंक ऑफ महाराष्ट्र) : "शाखेत नेटवर्क देणारी बीएसएनएलची केबल रस्त्याचे काम करत असताना तुटली आहे.त्यामुळे गेली दोन दिवस शाखेतील सिस्टीम बंद आहे. याबाबत विभागीय व मुख्य कार्यालयाला कल्पना दिली असून लवकरात लवकर सिस्टीम सुरू व्हावी,यासाठी पाठपुरावा केला जात आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com