बॅंकांच्या तिजोरीतच खडखडाट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

रोकड उपलब्ध होत नसल्याने किरकोळ रक्‍कम देऊन ग्राहकांची बोळवण
पिंपरी - औषधोपचासाठी रोख रक्‍कम हवी आहे, दररोजचे खर्च भागविण्यासाठी पैशाची गरज आहे, अशा एक ना अनेक कारणांसाठी शहरातील बॅंकेसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, बॅंकांच्या तिजोरीतच खडखडाट असल्याने त्यांना पैसे द्यायचे कसे, असा प्रश्‍न बॅंकांना पडला आहे. पुरेशा प्रमाणात बॅंकांना रोकड उपलब्ध होत नसल्याने किरकोळ रक्‍कम देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याने ग्राहकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्र सरकारने पाचशे रुपयांची नवीन नोट चलनात आणली असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात पुरेशा प्रमाणात उपलब्ध प्रमाणात नोटा अद्याप आल्या नाहीत, त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांचे पगार बॅंकेत जमा झाले आहेत. मात्र नोटांचा तुटवडा आणि बॅंकेतून रक्‍कम काढण्यासाठी टाकलेले बंधन यामुळे ग्राहकांना हवे तेवढे पैसे पडत नाहीत. बॅंकांच्या शाखांमध्ये येणारी रोख रक्‍कम अकराच्या सुमारास येत असली तरी बॅंकांबाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या नऊपासूनच रांगा लागत आहेत. बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांना तुम्हाला किती रक्‍कम काढायची आहे, असा सवाल कर्मचारी विचारतात. बॅंकेत कमी प्रमाणात रोख रक्‍कम येत असल्याने तुम्ही कमी रक्‍कम काढण्याची सूचना बॅंकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, बॅंकांमध्ये निर्माण झालेला चलन तुटवडा कधी सुरळीत होणार? या संदर्भात राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, 'सध्या बॅंकांना कमी प्रमाणात चलन येत असल्याने ग्राहकांना पैसे देताना अडचणी येत आहेत. रिझर्व्ह बॅंकेकडून दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास रुपयांच्या नोटांचा पुरवठा वाढल्यानंतर सध्या निर्माण झालेला चलन तुटवडा कमी होणार आहे. त्याला किती कालावधी लागेल याचे उत्तर नाही. बॅंकांकडे पुरेशा प्रमाणात सुटे पैसे उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.''

एटीएम बाहेर मोठ्या रांगा
खासगी बॅंकांच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेक भागांतील एटीएम मशिन्स अनेक दिवसांपासून बंद आहेत. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंकांना दररोज चलन उपलब्ध होत असल्याने शहरात असणारी राष्ट्रीयीकृत बॅंकांची एटीएम केंद्रे सुरू आहेत. ज्या केंद्रामध्ये रोख रक्‍कम उपलब्ध आहे. तेथे मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.

Web Title: banks safe empty