भिगवणला मिरवणुकीत पोलिसांचे 'दबंग' नृत्य

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

भिगवण, (पुणे) :
"कहते है करते है जो भी मर्जी,
सुनते नही है किसी की अर्जी
ठाणा मे बैठे है ऑन ड्यूटी,
बजावे हाय पांडे जी शिटी...

"दबंग' चित्रपटामधील या गाण्यावर चित्रपटातील चुलबुल पांडेप्रमाणे भिगवण (ता. इंदापूर) येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धरलेला ठेका येथील ग्रामस्थांना चित्रपटातील चुलबुल पांडेपेक्षाही अधिक भावला.

भिगवण, (पुणे) :
"कहते है करते है जो भी मर्जी,
सुनते नही है किसी की अर्जी
ठाणा मे बैठे है ऑन ड्यूटी,
बजावे हाय पांडे जी शिटी...

"दबंग' चित्रपटामधील या गाण्यावर चित्रपटातील चुलबुल पांडेप्रमाणे भिगवण (ता. इंदापूर) येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धरलेला ठेका येथील ग्रामस्थांना चित्रपटातील चुलबुल पांडेपेक्षाही अधिक भावला.

पोलिस ठाण्यामध्ये स्थापना केलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने पोलिसांनी बंदोबस्ताचा ताण झुगारून देत नृत्याचा ठेका धरला. त्यामध्ये नागरिकही मोकळेपणाने सहभागी झाले. येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. बुधवारी (ता. 19) विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. आरती झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. मिरवणुकीच्या सुरवातीलाच येथील ठाण्याच्या प्रांगणात सहायक पोलिस निरीक्षक राठोड यांनी ठेका धरला व त्यामध्ये येथील सुमारे पन्नास पोलिसही सहभागी झाले. त्यामुळे ग्रामस्थांना अभिनेता सलमान खान याच्या दबंग चित्रपटातील चुलबुल पांडे या पात्राचीच आठवण झाली. पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांचे नृत्य पाहण्यासाठी भिगवणमधील नागरिकही मोठ्या संख्येने जमले होते. ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

पोलिसांवरील वाढत्या ताणामुळे त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. अशा उपक्रमांमधून ताण कमी करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमांमुळे पोलिस व समाज दोघांनाही आनंद मिळाला.
- निळकंठ राठोड, सहायक पोलिस निरीक्षक, भिगवण (ता. इंदापूर)

Web Title: #BappaMorya Ganeshotsav bhigwan police dabang dance video