Pune : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राजेंद्र उमाप

राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या अध्यक्षपदी पुणे येथील वकील अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांची बिनविरोध निवड झाली आहे.
Pune : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राजेंद्र उमाप

Pune News : राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या अध्यक्षपदी पुणे येथील वकील अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांची बिनविरोध निवड झाली आहे. सध्या ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. उपाध्यक्षपदी काम करण्याची त्यांना दोनदा संधी मिळाली आहे.

या बार कौन्सिलमध्ये महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्ये आणि दादर नगर हवेली आणि दीव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. दोन लाखाहून अधिक वकील या संघटनेचे सभासद आहेत.

ॲड. उमाप यांनी यापूर्वी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ते सध्या आळंदी देवाची येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त आहेत. तसेच चिंचवड देवस्थानचे ट्रस्टचेही विश्वस्त आहेत. ज्यामध्ये मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर अष्टविनायकचा समावेश आहे. याशिवाय विविध पदे ते भूषवीत आहेत.

बार कौन्सिलचे कामकाज डिजिटल करण्यावर आमचा भर असणार आहे. प्रत्येक बार असोसिएशनला बार कौन्सिलच्या योजना लवकरात लवकर माहिती होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. वकील अकादमीसाठी जागा मिळाली असून त्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

बार कौन्सिलच्या वतीने २०२० पासून झालेल्या नवीन वकिलांचे मोफत मेडिक्‍लेम आणि अपघात क्‍लेम काढण्यात येत आहेत. वकिलांची सुरक्षितता, आरोग्य विषयक आणि इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. अ‍ॅड. राजेंद्र उमाप, नवनिर्वाचित अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com