esakal | बारामतीकरांची चिंता वाढतेय; 24 तासात 154 नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

in Baramati 154 new patients in 24 hours

कालपासून आज सकाळपर्यंत गेल्या 24 तासात 154 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने आज पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. या 24 तासात बारामती शहरात 78 तर ग्रामीण भागात 76 रुग्ण आढळलेले आहेत. शहराइतकेच रुग्ण आता तालुक्यातही सापडू लागल्याने तालुक्यातील लोकांनीही कमालीची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

बारामतीकरांची चिंता वाढतेय; 24 तासात 154 नवे रुग्ण

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची चिन्हे आजही दिसली नाहीत. चाचण्यांची संख्या वाढू लागली तशी रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. बारामतीतील लॉकडाऊनचा परिणाम जाणवण्यास काही दिवस अजून जावे लागतील, असा अंदाज वैद्यकीय व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. 24 तासात बारामतीत 154 रुग्ण सापडणे हा कोरोनाकाळातील एक उच्चांक आहे. बारामतीतील 1531 रुग्णसंख्या झाली असून 652 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बारामतीतील मृत्यूची संख्या 48 पर्यंत गेलेली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कालपासून आज सकाळपर्यंत गेल्या 24 तासात 154 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने आज पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. या 24 तासात बारामती शहरात 78 तर ग्रामीण भागात 76 रुग्ण आढळलेले आहेत. शहराइतकेच रुग्ण आता तालुक्यातही सापडू लागल्याने तालुक्यातील लोकांनीही कमालीची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

बारामतीतील रुई ग्रामीण रुग्णालय, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व खाजगी प्रयोगशाळेत तपासण्यांची गती व संख्या वाढल्याने त्याच वेगाने रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे. 

पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस​

...या मुळे वाढतीय रुग्णसंख्या....
पॉझिटीव्ह रुग्ण संख्या वेगाने वाढू लागल्याने त्यांच्या संपर्कातील लोकही झपाट्याने पॉझिटीव्ह येऊ लागले आहेत. त्या मुळे दिवसागणिक रुग्णसंख्येत वेगाने वाढ होऊ लागली आहे. पुरेशी काळजी घेतली न गेल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. जसजशी संख्या वाढू लागली आहे तशी बारामतीकरांचीही काळजी वाढू लागली आहे. बारामतीत लॉकडाऊनमुळे शुकशुकाट असल्याने परिस्थिती बदलण्यास काही काळ जावा लागेल, असे वैद्यकीय व्यावसायिकांनी सांगितले.