बाप रे ! बारामतीने ओलांडला चारशेचा टप्पा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

आज बारामतीत 21 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले असून यातही अजून काळजीची गोष्ट म्हणजे 67 जणांचे अहवाल अजून प्रतिक्षेत आहेत. काल बारामतीत 109 जणांचे नमुने आरटीपीसीआर तपासणीसाठी आले होते. खाजगी प्रयोगशाळेत 35 जणांचे नमुने तपासणीसाठी आले होते, त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

बारामती : शहरातील कोरोनारुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली असून हा प्रसार रोखण्यासाठी आता प्रभावी उपाययोजनांची गरज भासू लागली आहे. बारामतीतील कोरोनारुग्णांच्या संख्येने आज चारशेचा टप्पा पार केला. 

आज बारामतीत 21 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले असून यातही अजून काळजीची गोष्ट म्हणजे 67 जणांचे अहवाल अजून प्रतिक्षेत आहेत. काल बारामतीत 109 जणांचे नमुने आरटीपीसीआर तपासणीसाठी आले होते. खाजगी प्रयोगशाळेत 35 जणांचे नमुने तपासणीसाठी आले होते, त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 
मोठी बातमी : पुण्यात कोरोना रुग्णांबाबत नोंदविले गेलेत दोन रेकॉर्ड; वाचा सविस्तर​ 

शहराच्या जवळपास सर्वच भागातून व सर्व स्तरातून नागरिक कोरोनाग्रस्त होत आहेत. यात दिलासा देणारी एकच बाब अशी आहे की पॉझिटीव्ह असलेल्या बहुसंख्य रुग्णांमध्ये लक्षणे आढळत नाहीत. बारामतीचा कोरोनाचा मृत्यूदर कमी करणे व कोरोनाचा प्रसार थांबविणे हीच सध्या प्रशासनापुढील दोन प्रमुख आव्हाने आहेत. 
शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांत  भिगवण रोड, ढवाण वस्ती, गुणवडी चौक, कसबा, आमराई , बारामती शहर, भोई गल्ली, सिध्देश्वर गल्ली, दूध संघ वसाहत, एमएसईबी कॉलनी, मारवाड पेठ, जळोची, मार्केट यार्ड रोड येथील तर तालुक्यातून माळेगाव, पणदरे, मोरगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. मोरगाव येथील खाजगी दवाखान्यातील एक डॉक्टरही कोरोनाबाधित झाले आहेत.  

पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!​

तपासण्यांची संख्या वेगाने वाढल्याने रुग्णसंख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. आरटीपीसीआर या तपासणीपेक्षाही रॅपिट अँटीजेन तपासणीत रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे प्रमाण मोठे आहे. प्रतिक्षेत असलेल्या अहवालांपैकी काही अहवाल जर पॉझिटीव्ह आढळले तर बारामतीची कोरोनाबाधितांची संख्या वेगाने पाचशेच्या दिशेने वाटचाल करु लागली आहे, असे चित्र निर्माण होईल. 

...तर हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करा; उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Baramati 400 corona positive patients found